Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Rahul Gandhi: निष्ठावान,समर्पित कार्यकर्त्यांसह गोवा काँग्रेसची बांधणी करा

गोवा काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांची घेतली भेट

Sumit Tambekar

गोवा काँग्रेस प्रदेशाध्येक्ष अमित पाटकर तसेच विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आज कर्नाटकमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी गांधी यांनी निष्ठावान, प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्त्यांसह मजबूत काँग्रेस उभारण्याचा सल्ला दिला आहे. असे पाटकर यांनी सांगितले ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते.

(Rahul Gandhi told Build Goa Congress with loyal honest workers )

याबाबत पाटकर म्हणाले की, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यासह आपण आज कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस संघटना उभारणीच्या भविष्यातील योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही एकसंघ राहून कठोर परिश्रम करू, आमच्या दिशादर्शकात निश्चित केलेली लक्ष्ये साध्य करू असे त्यांनी सांगितले,यावेळी पाटकर, आलेमाव यांनी भारत जोडो यात्रेत सहभागही नोंदवला.

राहुल गांधी यांच्यासोबतची भेट फलदायी ठरली

कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्यासोबतची भेट फलदायी ठरली असुन त्यांचे मार्गदर्शनाने आम्हाला गोव्यात लढण्यास आणि जनतेसाठी काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे. तसेच गांधी यांनी केलेले कौतुक आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. असे पाटकर म्हणाले. यावेळी आमदार ॲड. कार्लोस आल्वारीस फरेरा आणि अ‍ॅल्टन डिकोस्टा यांच्याबरोबर लोकांसाठी एकजूटीने लढा देण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकट करू, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती, संघटनात्मक मांडणी आणि पक्षाची तळागाळात बांधणी करण्यासाठी आवश्यक बदल याविषयी सविस्तर चर्चा केली. राहुल गांधींनी नेत्यांना पक्षात सुधारणा करण्यास आणि बेशिस्तांवर कठोर कारवाई करण्यास हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

Bicholim: बेपत्ता महिला अखेर बेळगावी येथील आश्रमात सापडली, हातुर्लीतील चंद्रिकाचा आठवडाभरापासून सुरू होता शोध

Supreme Court: काहींना तुरुंगात टाकल्यास धडा मिळेल, काडीकचरा जाळणाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT