पुण्यातून सायकलवरून गाठलं गोवा! ३ युवकांचा ‘पर्यावरणासह आरोग्य सांभाळा’चा संदेश; कन्याकुमारी गाठण्याचे ‘लक्ष्य’

Pune Goa Cycling : ‘पर्यावरणासह आरोग्य सांभाळा’ असा संदेश देत पुणे येथील तीन युवक पुणे ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवरून प्रवास करीत आहेत.
Pune Goa Cycling
Pune Goa CyclingDainik Gomantak
Published on
Updated on

Pune to Goa Cycle Journey : ‘पर्यावरणासह आरोग्य सांभाळा’ असा संदेश देत पुणे येथील तीन युवक पुणे ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवरून प्रवास करीत आहेत. सोमवारी (ता.२२) रात्री हे युवक डिचोलीत पोहोचले होते.

येथील शहाजी शिवले पाटील कुटुंबाने या सायकलस्वारांचे स्वागत केले. रात्री डिचोलीत वास्तव्य केल्यानंतर मंगळवारी सकाळी जुने गोवेमार्गे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. सुनील दास, संतोष रोडे आणि सुनील जगदाळे अशी सायकलवरून प्रवास करणाऱ्या या युवकांची नावे आहेत.

Pune Goa Cycling
Goa To Pandharpur Cycling: साखळीच्या माजी सैनिकाची अनोखी 'पंढरपूर वारी': 70-80 किमी सायकल चालवत विठुरायाच्या चरणी होणार नतमस्तक

गेल्या शनिवारी (ता.२०) पुणे येथून या सायकल प्रवासाला प्रारंभ झाला आहे. सोळाशे किलोमीटर अंतर कापून येत्या ४ जानेवारीपर्यंत कन्याकुमारी गाठण्याचे ‘लक्ष्य’ या युवकांनी ठेवले आहे. आतापर्यंत या युवकांनी साडेचारशेहून अधिक किलोमीटर अंतर कापले आहे.

Pune Goa Cycling
Cycling in Goa: निसर्गरम्य गोव्यातील 'सायकलींग' अडकलेय दुष्टचक्रात; खराब रस्ते, भटकी कुत्री, बेशिस्त वाहतुकीची भेडसावतेय समस्या

सायकल चालविल्याने आरोग्य राहते सुदृढ

सायकलवरून गोव्यात येताना मनोहारी निसर्गसौंदर्य पाहावयास मिळाले, असे सुनील दास आणि संतोष रोडे यांनी सांगून आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने सायकल चालवावी, असे आवाहन केले आहे.

सायकलने प्रवास करताना ते पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत. कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर हे सायकलस्वार रेल्वेने परतीचा रस्ता धरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com