Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

मी जे बोलणार तेच गोव्यात घडणार: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी गोव्यात (Goa Assembly Election 2022) पोहोचले. येथे त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर गोवा हे अत्यंत प्रभावशाली असे राज्य आहे. मात्र विकासाच्या नावावर फक्त सरकार लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छिमार बांधव अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.

यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी गोव्यात (Goa Assembly Election 2022) पोहोचले. येथे त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली. राहुल गांधी यावेळी म्हणाले की, आम्ही छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवली आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले. आम्ही पंजाब आणि कर्नाटकात गेलो, तिथेही तेच केले. आमच्या जाहीरनाम्यात केवळ आश्वासन नसून हमी असते. "यूपीए सरकारच्या काळात, आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या होत्या. आज आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी असताना तुम्ही जास्त किंमतीला पेट्रोल- डिझेलची खरेदी करत आहात. भारत जगातील सर्वात जास्त इंधनावर कर लावत आहे, मात्र व्यवस्थित पाहिले तर फक्त 4-5 व्यावसायिकांना याचा फायदा होत आहे.

वायनाडचे खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून म्हणाले, तुमच्या मनात काय आहे ते ऐकण्यात मला रस आहे. आमची रणनीती गोव्यातील लोकांचा आवाज बनून त्यांचे हित जपायचे आहे. आमची बिलकुल इच्छा नाही की, गोवा एक कोल हब बनावे. गोव्याला याचा फायदा होणार नाही उलट पर्यावरणाची हानी होईल. मला तुमच्या समस्यांबद्दल तुमचे विचार ऐकायचे आहेत.

मी जे बोलेन ते गोव्यात होईल : राहुल गांधी

राहुल गांधी पुढे म्हणाले, ''तुम्ही माझ्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागावे अशी माझी इच्छा आहे. लाजू नका. मला येथे काय हवे आहे ते मला सांगा जेणेकरुन मला कळेल की, तुमच्या समस्या काय आहेत. माझ्या बाबतीत, गोव्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण आणि त्याचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत केले पाहिजे. आम्ही गोव्याला प्रदूषित ठिकाण बनू देणार नाही. मी येथे जे काही बोलेन ते गोव्यात निश्चित होईल. इतर नेत्यांप्रमाणे मी खोटे बोलत नाही.''

शिवाय, 'आणि मी तुम्हाला खात्री देतो की मी इथे काही बोललो तर ते गोव्यातच असेल. आम्ही गोव्याला कोळसा हब होऊ देणार नाही. आम्ही केवळ गोव्यातील लोकांसाठी पर्यावरणाचे रक्षण करत नाही. आम्ही भारतातील लोकांसाठी पर्यावरणाचे रक्षण करत आहोत,' असही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT