'डॉन्की राजा की सरकार नहीं चलेगी'  इम्रान खान सरकारवर विरोधकांचा निशाणा

khan 3.jpg
khan 3.jpg
Published on
Updated on

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे इम्रान खान (Imran Khan) यांच्या समोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताच पाकिस्तानमधील (Pakistan) विरोधकांनी इम्रान खान यांना घेराव करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर विरोधकांनी 'डॉन्की राजा की सरकार नही चलेगी' अशा घोषणा सभागृहामध्ये देण्यास सुरुवात केली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी 'डॉन्की राजा की सरकार नहीं चलेगी' अशा घोषणा देत इम्रान सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. सरकारला विरोध करण्यासाठी खासदारांनी हातामध्ये पोस्टर घेतले होते. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. मात्र इम्रान खान यांच्या कारकिर्दीत अर्थव्यवस्था (Economy) बुडत आहे, महागाई अगदी गगनाला भिडली, असा मजकूर त्या पोस्टवर त्या लिहलेला होता. (Donkey Rajas government will not run Imran Khans government targeted by protesters)

2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राबवण्यात येणाऱ्या योजना संसदेमध्ये (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मांडण्यात आल्या होत्या. पण यावेळीही विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच इम्रान खान यांचे सरकार पाकिस्तानमध्ये स्थापन झाल्यापासून गाढवांची सरकार वाढत असल्याचे विरोधकांनी म्हटले.

इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी
पाकिस्तानमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षात गाढवांची संख्या वाढून 56 लाख झाली आहे. वाढत्या गाढवांच्या संख्येला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तान त्यांची चीनमध्ये (China) निर्यात करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. चीन त्यांना सर्वात जास्त किंमत खरेदी करतो.

पाकिस्तानात गाढवांची संख्येत मोठी वाढ
2021 मध्ये गाढवांची संख्या सर्वात जास्त असणारा पाकिस्तान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असे जिओ माध्यमांनी म्हटले आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार 2021 च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात दरवर्षी 10,000 गाढवांची वाढ होत आहे. म्हशींच्या संख्येत 1.2 दशलक्षांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मेढ्यांच्या संख्येमध्ये 31.2 दशलक्षांवर गेली आहे. पंजाब पशुधन विभागाने पाकिस्तानमध्ये गाढवे आणि जनावरे यांच्या संख्येत झालेली वाढ पहिल्यांदा उघडकीस आणली होती.

अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद 
शुक्रवारी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पुढील आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी 1370 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 6.2 टक्केची वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीसाठी करण्यात आलेल्या तरतूदीवरुन पाकिस्तान रेंजर्स नाराज असल्याची माहिती होती. तर दुसरीकडे इम्रान खान देशाचा कारभार संभाळू शकत नाही असा आरोप करण्यात येत आहे. देशाकडे गाढवांप्रमाणे लक्ष दिले असते तर अशी कठीण परिस्थीती उद्भवली नसती, असे विरोधांकाचे म्हणणे आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com