Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized BJP: भाजप गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण करत असल्याचा घणाघात राहुल यांनी केला.

Manish Jadhav

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात राळ उडाली असतानाच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रविवारी (6 ऑक्टोबर) भाजपर जोरदार हल्लाबोल केला. भाजप गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण करत असल्याचा घणाघात राहुल यांनी केला. राज्य आणि संपूर्ण देशातील जनता भाजपचा फुटीरतावादी अजेंडा बघत असल्याचे देखील राहुल यांनी यावेळी नमूद केले.

भाजपच्या राजवटीत सौहार्दावर हल्ला- राहुल

राहुल पुढे म्हणाले की, ''भाजपच्या राजवटीत राज्यासह देशातील सौहार्दावर हल्ला केला जात आहे. भाजप जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण करत आहे. एवढचं नाहीतर आरएसएसच्या एका नेत्याने ख्रिश्चन आणि संघांच्या संघटनांना मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी चिथावणी देखील दिली आहे.''

'गोव्याच्या नैसर्गिक आणि सामाजिक वारशावर हल्ला'

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे शोषण करताना हरित भूमीचे अवैध रुपांतर करुन आणि पर्यावरणीय नियमांना बगल देऊन लोकांमध्ये फूट पाडणे ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे. भाजपचा हा अजेंडा गोव्याच्या नैसर्गिक आणि सामाजिक वारशावर हल्ला आहे. गोव्यासह संपूर्ण देशातील लोक आता भाजपच्या फुटीरतावादी अजेंड्याच्या विरोधात एकत्र येत आहेत, असेही राहुल यांनी नमूद केले.

गोवा पोलिसांची शोध मोहीम

दरम्यान, वेलिंगकरांना पकडण्यासाठी आता गोवा पोलिसांनी राज्यासह शेजारील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुभाष वेलिंगकर गायब आहेत. सीमावर्ती भागात पोलिसांनी ही मोहीम सुरु केली आहे. वेलिंगकरांच्या विरोधात राज्यात सध्या संतप्त भावना उमटत आहेत. गोव्यातील अनेक भागांमधून वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करणारी निवेदने सादर केली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT