Congress Leader Amit Patakar Dainik Gomantak
गोवा

राहुल गांधी ED केसचे पडसाद गोव्यात; GPCC अध्यक्षांसह कार्यकर्ते ताब्यात

GPCC अध्यक्षांसह सर्व ताब्यात घेतलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पणजी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईडी ने कारवाई केली आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असतानाच गोव्यात देखील काँग्रेस पक्षाने राजभवना समोर आंदोलन केले; राहुल गांधी यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची देखील उपस्थिती होती.

(Rahul Gandhi ED case backfires in Goa; Activists including GPCC president detained)

GPCC

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत असलेल्या इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना पेडणे येथे नेण्यात आले होते मात्र; GPCC अध्यक्षांसह सर्व ताब्यात घेतलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पणजी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आमदार संकल्प आमोणकर, आमदार युरी आलेमाओ, आमदार केदार नाईक आणि आमदार एल्टन डकोस्टा पणजी पोलीस ठाण्यात आले आहेत.

GPCC

पक्षाचे सुमारे 800 ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते ताब्यात

अंमलबजावणी संचालनालय गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. मात्र काँग्रेसचे नेते याला कडाडून विरोध करत आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे, मात्र काँग्रेस नेते त्याचे उल्लंघन करत ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. दरम्यान, सोमवारपासून कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पक्षाचे सुमारे 800 ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंच्या काळात स्थापन झालेलं हे वर्तमानपत्र आहे. आणि त्याच्या प्रकाशक कंपनीसाठी आता राहुल, सोनिया यांची चौकशी का होतेय, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी असताना काँग्रेस पक्षाचा पैसा नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करणारी कंपनी विकत घेण्यासाठी वापरला असा दोघांवरही आरोप आहे.

या बाबतीतले पहिले आरोप भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे नेते सुब्रह्मण्याम स्वामी यांनी पहिल्यांदा 2012 मध्ये केले होते. तर गांधी कुटुंबीयांनी कायम कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अफरातफरीचे आरोप फेटाळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT