Goa Pradesh Congress Committee  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: राहुल गांधींच्या समर्थनात तोंडाला काळी पट्टी बांधून गोवा काँग्रेसचा मौन सत्याग्रह

राहुल गांधींनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावावरुन टिप्पणी केली होती.

Pramod Yadav

मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी दोषी ठरले. त्यानंतर गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला.

नुकतेच 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या समर्थनात गोवा प्रदेश काँग्रेसच्या वतीने तोंडाला काळी पट्टी बांधून मौन सत्याग्रह केला.

पणजीतील आझाद मैदान येथे दुपारी बारा वाजता काँग्रेसच्या मौन सत्याग्रहाला सुरूवात झाली. यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदारा कार्लुस फरेरा यांच्यासह विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभाग घेतला.

'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे. शुक्रवारी (दि.07) झालेल्या सुनावणीत राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

राहुल गांधींनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावावरुन टिप्पणी केली होती. ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी यांची नावे घेत त्यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असे वक्तव्य केले होते.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT