Govind Gaude: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोर रवींद्र भवन बांधण्याची योजना होती. पण चार वर्षानंतरही ती आकाराला आलेली नाही. आता येथील हे नियोजित रवींद्र भवन कुचेली येथे हलविण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. कुचेली येथील रवींद्र भवन प्रकल्पाच्या नवीन जागेची पाहणी त्यांनी सोमवारी केली.
म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि म्हापसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) नगरसेवकांनी यावेळी मंत्री गावडे यांची भेट घेतली. कुचेली येथील साई बाबा मंदिराजवळ सुमारे 18,000 चौरस मीटर जागेत हे रवींद्र भवन होऊ शकते.
ही जागा स्थानिक कोमुनिदादच्या मालकीची आहे. कुचेली कोमुनिदादने प्रकल्पाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास सहमती दिली आहे.
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, बार्देश येथील रवींद्र भवनाच्या उभारणीला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे मी नेहमीच सांगितले आहे. म्हापसाचे आमदार, MMC नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, कुचेली कोमुनिदाचे अध्यक्ष मायकल कॅरास्को आणि इतर नगरसेवकांसह नवीन जागेची पाहणी केली.
हे एक आदर्श ठिकाण आहे. हा जागा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जवळ आहे. कुचेली कोमुनिदादने प्रकल्पासाठी जमीन देण्याचे मान्य केल्यामुळे आम्हाला जमीन संपादन करण्याचीही गरज नाही.
गावडे यांनी या प्रकल्पाच्या बाजूने ठराव मंजूर करून योजना व इतर संबंधित तपशील त्यांच्या विभागाकडे सादर करण्यास सांगितले जेणेकरुन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर हाती घेता येईल.
बोडगेश्वर मंदिराची जागाही चांगली आहे पण काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सरकारला तिथे काही करता आले नाही. बोगेश्वर मंदिरासमोरील विस्तीर्ण जागेवर सुमारे 40,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर रवींद्र भवन बांधण्याची सुरुवातीची योजना होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.