IFFI Goa Indian Panorama Movies Dainik Gomantak
गोवा

IFFI Film Premiere: इफ्‍फीत ‘हिसाब बराबर’ सिनेमाचा जागतिक प्रीमियर; इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार ‘अमर आज मरेगा’ चित्रपट

IFFI Goa Indian Panorama Movies: येत्या 26 नोव्‍हेंबर रोजी रसिकांना ‘हिसाब बराबर’ पाहायला मिळेल तसेच ‘अमर आज मरेगा’ हा चित्रपट इंडियन पॅनोरमामध्ये प्रदर्शित होणार आहे

Akshata Chhatre

Hisaab Barabar and Amar Aaj Marega Movie Premiere at IFFI 2024

पणजी, ता. 14 (प्रतिनिधी) : प्रख्यात अभिनेता आर. माधवन याच्या ‘हिसाब बराबर’ या चित्रपटाचा इफ्फीत जागतिक प्रीमियर होणार आहे. येत्या 26 नोव्‍हेंबर रोजी हा चित्रपट महोत्सवात रसिकांना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला प्रख्यात दिग्दर्शक प्रकाश झा हे अभिनय करताना दिसतील. ‘अमर आज मरेगा’ हा त्यांचा चित्रपट इंडियन पॅनोरमामध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना माधवन म्हणाला की, ‘हिसाब बराबर’ हा सिनेमा म्‍हणजे केवळ भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई नाही तर ती एक नैतिक जबाबदारीची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. हा चित्रपट अश्‍‍वनी धीर यांनी दिग्दर्शन केला असून चित्रपटात विनोद, व्यंग आणि तीव्र भावना यांचे मिश्रण पाहायला मिळेल.

कॉर्पोरेट बँकेतील अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी धाडसी लढा देणारा सामान्य माणूस आर्थिक फसवणुकीच्या व्यापक समस्येचा धैर्याने सामना कसा करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.

‘हिसाब बराबर’ या चित्रपटात माधवनने राधेमोहन शर्माची भूमिका केली आहे, जो एक रेल्वे तिकीट तपासनीस आहे. त्‍याला त्याच्या बँक खात्यात एक लहानशी पण न समजण्याजोगी तफावत आढळते. एक किरकोळ समस्या म्हणून तपासणी करता करता तो मोठा घोटाळा ठरतो. त्यामुळे एक चतुर बँकर मिकी मेहताने (नील नितीन मुकेश) केलेल्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा तो पर्दाफाश करतो.

" मला इफ्फीत ‘हिसाब बराबर’ प्रदर्शित होत असल्‍याचा अभिमान वाटतो. राधेच्या प्रवासाद्वारे आम्ही एका सामान्य माणसाच्या जगाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असलेल्या गुंतागुंतीचा शोध घेतो, जिथे न्याय अनेकदा आवाक्याबाहेरचा वाटतो. जीओ स्टुडिओ आणि एसपी सीनेक्रॉपसोबतच्या आमच्या सहकार्याचाही मला अभिमान वाटतो आणि आशा आहे की हा सिनेमा निश्‍चितच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल." - अश्‍‍वनी धीर, सिनेदिग्‍दर्शक.

दिग्दर्शक प्रकाश झा यांचा वजनदार अभिनय

प्रख्यात सिनेदिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘अमर आज मरेगा’ हा चित्रपट इंडियन पॅनोरमामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्‍यात त्‍यांनी अमर या 62 वर्षीय विधुराची मुख्य भूमिका साकारली आहे, ज्याला असे वाटते की तो पूर्ण आयुष्य जगला असून आता त्याला स्वतःला संपवायचे आहे.

तथापि, त्याने अंतिम पाऊल उचलण्याची योजना आखली असताना, निमंत्रित पाहुण्यांमुळे यात व्यत्यय येतो आणि अनपेक्षित घटनांचे वावटळ उठते. मला अमरचे पात्र आश्चर्यकारकपणे सूक्ष्म आणि यापूर्वी साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा वेगळे वाटले, त्‍यामुळे आपण आकर्षित झाल्‍याचे ते सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT