Farrey Premiere In IFFI: सलमानच्या भाचीचा 'फर्रे' इफ्फीत होणार प्रदर्शित, भाईजानने दिल्या खास शुभेच्छा

Farrey Premiere In IFFI: इंडियन पॅनोरमामध्ये समाविष्ट 25 फीचर आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे.
Farrey
Farrey Instagram
Published on
Updated on

Farrey Premiere In 54th IFFI Goa: भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. इंडियन पॅनोरमामध्ये समाविष्ट 25 फीचर आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे.

या महोत्सवात सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा पहिला चित्रपट 'फर्रे' प्रदर्शित केला जाणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अभिषेक यादव आणि पाधी यांनी चित्रपटाचे लिखाण केले आहे.

फर्रे शैक्षणिक क्षेत्रातील फसवणूक आणि गुंतागुंत यात डोकावतो. नियती नावाच्या अनाथ विद्यार्थीनीला शिष्यवृत्ती मिळाली आहे मात्र, तिच्याच श्रीमंत मित्रांमुळे ती एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये अडकते.

फर्रे, 'कंतारा', 'शेरशाह' आणि 'सिर्फ एक बंदा कॉफी है' सोबत प्रदर्शित केला जाईल.

Farrey
Bigg Boss : बिग बॉसच्या घरची भांडणं काही थांबेनात, आता अंकिता - ऐश्वर्या भिडल्या

फर्रे हा महत्त्वाकांक्षा आणि नैतिकता यांच्यातील गुंतागुंतीवर भाष्य करणारा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा समाजातील धारणांना आव्हान देते. सलमान खानची भाची अलिझेहचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, असे सिनेमाचे दिग्दर्शक सौमेंद्र पाधी म्हणाले.

"इफ्फी हा एक अतिशय प्रतिष्ठित महोत्सव आहे आणि मला आनंद आहे की त्यात फर्रे इफ्फीत प्रदर्शित होत आहे. इफ्फीच्या माझ्याकडे गेल्या काही वर्षांतील काही गोड आठवणी आहेत आणि आता फर्रेचा पॅनेलमध्ये प्रवेश झाल्यामुळे वर्तुळ पूर्ण असल्यासारखे वाटते. मी फर्रेच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो की प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल," असे अलीझेहचा काका अभिनेता सलमान खान म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com