Goa Paragliding Accident Death Dainik Gomantak
गोवा

Paragliding Accident: पॅराग्लायडिंग करताना दोघांचा अपघाती मृत्यू, 1 वर्षानंतर मुख्य संशयितावरील गंभीर गुन्हा हटवला

Querim Paragliding Accident: गेल्या वर्षी झालेल्या भीषण पॅराग्लायडिंग अपघातात नेपाळी पायलट सुमन नेपाळी आणि महिला पर्यटक शिवानी दाबाळे यांचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केरी-तेरेखोल (ता. पेडणे) किनाऱ्यावर गेल्या वर्षी झालेल्या भीषण पॅराग्लायडिंग अपघातात नेपाळी पायलट सुमन नेपाळी आणि महिला पर्यटक शिवानी दाबाळे यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुख्य संशयित ‘हाईक एन फ्लाय’ कंपनीचा मालक शेखर रायजादा (वय ४२ वर्षे) याच्यावरील सदोष मनुष्यवधाचे कलम हटविले असून आता केवळ त्याच्यावर पुराव्यांच्या आधारे कलम १०६(१) नुसार निष्काळजीपणाचा खटला सुरू राहणार आहे.

न्यायालयाने रायजादा याच्यावरील भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०५ अंतर्गत असलेले आरोप हटविले आहेत. १८ जानेवारी २०२५ रोजी केरी पठारावर पॅराग्लायडिंग करताना हा अपघात झाला होता. यात महाराष्ट्रातील पर्यटक शिवानी दाबाळे आणि सुमन नेपाळी यांचा पॅराग्लायडिंगवेळी पडून मृत्यू झाला होता. हे पॅराग्लायडिंग पर्यटन खात्याच्या परवानगीविना व सुरक्षा साधनांिवना सुरू होते, असे तपासात समोर आले होते.

पूर्वनियोजित नव्हे!

न्यायालयाने मुख्य संशयिताचा युक्तिवाद मान्य करत या प्रकरणात कलम १०५ लागू होईल इतके गंभीर पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी नमूद केले की, हा प्रकार शुद्ध निष्काळजीपणाचा आहे. पर्यटन खात्याचा परवाना नसतानाही सेवा पुरविणे हा गंभीर निष्काळजीपणा असला तरी तो पूर्वनियोजित गुन्हा मानला जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

SCROLL FOR NEXT