Quepem  Dainik Gomantak
गोवा

Quepem News : पत्रकारांनी निःपक्षपातीपणे वृत्तांकन करावे : सुभाष फळदेसाई

सांगे-केपे ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापनदिन, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem : पत्रकारांनी लोकांच्या समस्या जनतेसमोर मांडल्या पाहिजेत. पत्रकारितेचा फायदा वेगळ्याच कारणासाठी न घेता जेव्हा वार्तांकन होते, तेव्हा दुसरी बाजूसुद्धा समजून घ्यावी व बातमीला न्याय द्यावा, असे आवाहन समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. सांगे - केपे ग्रामीण पत्रकार संघाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी रिवणचे जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सांगेच्या नगराध्यक्ष प्रीती नाईक, उपनगराध्यक्ष केरोज क्रुज, सरपंच चंद्रकांत गावकर, नगरसेवक संगमेश्वर नाईक, परीक्षक आश्विनी जांबावलीकर, ममता प्रभुगावकर, सांगे - केपे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्यामकांत नाईक, सरचिटणीस ॲड. अमर नाईक, खजिनदार धीरज हरमलकर उपस्थित होते.

समाज माध्यमाचा फायदा घेऊन काही स्वयंघोषित पत्रकार आपल्याला हवे तसे वार्तांकन करतात. त्यामुळे आज कर्तव्यनिष्ठ पत्रकारांवर टीका होऊ लागली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन करणे, दोन्ही बाजू व्यवस्थितपणे समाजासमोर आणणे हे पत्रकाराचे काम आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला हा वारसा निःपक्षपातीपणे पुढे नेण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले. सांगेत येत्या 20 ऑगस्ट रोजी शेकडो कोटींच्या कामांचे उद्‍घाटन केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जर्मनी येथे विशेष मुलांच्या जागतिक खेळात सांगे येथील सिया सरोदे यांनी भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे व ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. आई वडिलांचे छत्र नाही, त्यात काही शाळांनी तिला प्रवेश दिला नाही म्हणून सिया सरोडे मागे राहिली नाही.

तिने आपल्या दिव्यांगावर मात करत जर्मनीत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला अनेक पदके प्राप्त करून दिली. सियाला राज्य सरकारतर्फे चौदा लाख देण्यात येणार असून केंद्र सरकारकडूनही तिला मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करीत असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

सिया सरोदे व शिक्षिकेचा सत्कार

जर्मनी येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत विशेष कामगिरी बजावलेल्या सिया सरोदे या विद्यार्थिनीचा आणि निवृत्त शिक्षिका सुजाता राव वालावलीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे पहिले बक्षीस उत्कर्ष हायस्कूल रिवण यांना, दुसरे युनियन हायस्कूल सांगे यांना, तर तिसरे बक्षीस जांबावली सरकारी हायस्कूल यांना प्राप्त झाले. मायणा सरकारी हायस्कूलला चौथे उत्तेजनार्थ आणि कोळंब सरकारी हायस्कूलला पाचवे उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT