Quepem News  Dainik Gomantak
गोवा

Quepem News: केपेत गणेशोत्सव देणगी कुपन शुभारंभावेळी हुल्लडबाजी; चेंगराचेंगरीच्या भीतीने काऊंटर बंद

गर्दीमुळे मोडला काऊंटर; मंत्र्यांनीही भाषणे घेतली आवरती, दहा मिनिटांत काऊंटर बंद

Akshay Nirmale

Quepem News: केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव‌‌‌ मंडळाच्या देणगी कुपनाचा शुभारंभ झाल्यानंतर हजारो लोकांनी घुसखोरी केल्यामुळे देणगी कुपन विक्रीचा काउंटर मोडला गेला. त्यानंतर दहा मिनिटांत काउंटर बंद केला गेला.

उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या सुचनेनुसार लॉटरी विक्री बंद केली असल्याचे समितीने स्पष्ट केले.

सकाळी पाच वाजल्यापासून देणगी कुपनासाठी लोक उभे होते. दहा वाजेपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोक रांगेत होते. लोकांनी सुरवातीपासूनच हुल्लडबाजी केल्यामुळे शुभारंभाच्या कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे खासदार सदानंद तानावडे व मंत्री निलेश काब्राल यांनीच आटोपती भाषणे केली.

या कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार अॅल्टन डीकॉस्टा, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पण लॉटरी प्रिय जमावाने वारंवार गोंधळ केल्यानंतर दोघांच्या भाषणानंतर देणगी कुपनांच्या विक्रीला सुरवात झाली.

लोकांचा कल पाहून गोंधळ होण्याची शक्यता केपेचे पोलिस निरीक्षक संदिप पेडणेकर यांनी व्यक्त केली होती. सुरवातीला दहा मिनिटे कुपनविक्री झाल्यानंतर लोक रांग तोडून आत घुसू लागले. त्यामुळे धक्काबुक्की होवून तिकीट काउंटर मोडला.

हजारो लोकांना आवरणे पोलिस व मंडळाच्या स्वयंसेवकांना कठिण झाले. अखेर देणगी कुपनांचा विक्री काउंटर बंद करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT