Quepem lottery news Dainik Gomantak
गोवा

Quepem lottery: केपेची लॉटरी ठरली 'हिट'! गणेशोत्सव मंडळाच्या कूपनसाठी मध्यरात्रीपासून गर्दी; 2 कि.मीची रांग

Quepem Ganesh lottery: दक्षिण गोव्यातील सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी कुपन काढण्याच्या कार्यक्रमाला यंदा प्रचंड प्रतिसाद लाभला.

Akshata Chhatre

फोंडा: दक्षिण गोव्यातील सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी कुपन काढण्याच्या कार्यक्रमाला यंदा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी तब्बल १.५ लाख लॉटरी कुपन छापण्यात आली होती, आणि ती खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली.

मध्यरात्रीपासून २ किमी लांब रांगा; तरीही शिस्तबद्ध आयोजन

यंदा या कार्यक्रमाची अभुतपूर्व क्रेझ पाहायला मिळाली. कुपन खरेदी करण्यासाठी उत्सुक नागरिकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. या रांगा केपे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून थेट टिळामळ जंक्शनपर्यंत, तब्बल २ किलोमीटरपर्यंत पसरल्या होत्या. प्रचंड गर्दी असूनही, या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

यामागे केपे पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन होते. त्यांनी केलेल्या गर्दी आणि वाहतूकी प्रभावी व्यवस्थापनामुळे कुठलाही गोंधळ झाला नाही. तसेच, दिवसभर सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले. केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा लॉटरी कार्यक्रम दक्षिण गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचा वार्षिक सोहळा मानला जातो आणि यंदाच्या विक्रमी उपस्थितीने त्याची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

SCROLL FOR NEXT