
पणजी: गोवा सरकारने मार्चपासून लॉटरीच्या व्यवसायात पूर्ण क्षमतेने उतरण्याचे ठरविले आहे. दररोज १५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस देणाऱ्या या लॉटरीचा निकाल ३ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.
सरकारच्या लघुबचत व सोडत संचालनालयाने या लॉटरीसाठी वेगवेगळी नावे दिली आहेत. आठवड्यात दररोज ३ कोटी रुपयांची १० लाख लॉटरी तिकिटे विकली जातील असे गृहीत धरून सारी रचना करण्यात आली आहे. सुमित ऑनलाईन ट्रेड सोल्युशन्सकडे या तिकिटांची गोव्यासह महाराष्ट्र, पंजाब, सिक्कीम येथे विक्री करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजश्री ३० सोम साप्ताहिक लॉटरी (३ मार्चपासून दर सोमवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीतून सरकारला ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यातून वस्तू व सेवा कर वजा करता निव्वळ २ कोटी ३४ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळेल. महाराष्ट्र, पंजाब, सिक्कीमसह गोव्यात या लॉटरीची तिकिटे विकली जातील. या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे आहे. एकूण बक्षिसांची रक्कम १ कोटी १८ लाख ४ हजार ५०० रुपये आहे.
राजश्री ३० मंगल साप्ताहिक लॉटरी (४ मार्चपासून दर मंगळवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीची १० लाख तिकिटे विकली जातील. प्रत्येक तिकिटाची किंमत ३० रुपये असेल. या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे आहे. राजश्री ३० बुध साप्ताहिक लॉटरीचे तिकीट ३० रुपयाला मिळेल. यातूनही ३ कोटी रुपये मिळतील. (५ मार्चपासून दर बुधवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपये असेल.
राजश्री ३० गुरू साप्ताहिक लॉटरी (६ मार्चपासून दर गुरूवारी ८.३० वाजता निकाल). १ लाख १८ हजार ४ हजार ५०० रुपयांची ४८ हजार ११० बक्षिसे या लॉटरीच्या माध्यमातून दिली जातील. राजश्री ३० शुक्र साप्ताहिक लॉटरी (७ मार्चपासून दर शुक्रवारी ८.३० वाजता निकाल). या तिकिटाचे मूल्य ३० रुपये असून १० हजार तिकिटे विकली जाणार आहेत. यासुद्धा लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख आहे. राजश्री ३० शनी साप्ताहिक लॉटरीचा निकाल ८ मार्चपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.
लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे असेल. नऊ हजार रुपयांची १००, दोन हजार रुपयांची एक हजार, एक हजार रुपयांची दोन हजार, १२० रुपयांची ४५ हजार तर ५०० रुपयांची ९ मिळून १ कोटी १८ लाख ४ हजार ५०० रुपयांची ४८ हजार ११० बक्षिसे दिली जाणार आहेत.
या लॉटरी विक्रीतून दररोज ३ कोटी रुपये जमा होतील. त्यातून सरकारच्या खजिन्यात दररोज ६५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा वस्तू व सेवा कर जमा होणार आहे. यामुळे लॉटरीचा निव्वळ महसूल २ कोटी ३४ लाख ३७ हजार ५०० रुपये असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.