Quarrel in Mapusa over Shivaji Maharaj Statue Dainik Gomantak
गोवा

म्हापशाच्या एकतानगरातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरुन वाद

पोलिसांच्या सूचनेवर शिवप्रेमी नाराज; एकतानगराला पोलिस छावणीचे स्वरूप

दैनिक गोमन्तक

म्हापसा : एकतानगर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा मंगळवारी अक्षय्य तृतीयेदिवशी उभारला. मात्र, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तो पुतळा हटवण्याचा आग्रह धरल्यामुळे काल बुधवारी सकाळपासून शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकतानगरात जमले. पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना, उपअधीक्षक उदय परब, निरीक्षक परेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे या भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. (Quarrel in Mapusa over Chh. Shivaji Maharaj Statue)

म्हापशातील एकता नगरमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव वास्तव्य करतात. तसेच, अक्षय्य तृतीया व रमझान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून या भागात पोलिस बंदोबस्त ठेवला. बुधवारी सायंकाळी अनेकविध हिंदू संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांची एकतानगरात सभा झाली. यावेळी ‘स्वराज्य गोमन्तक’चे अध्यक्ष प्रशांत वाळके म्हणाले, की शिवप्रेमींनी उभारलेला पुतळा कायदेशीर करण्यासाठी स्वराज्य संस्था पुढाकार घेणार आहे. शिवप्रेमींच्या भावनांशी पोलिसांनी खेळ मांडू नये. आमदार जोशुआ डिसोझा हे पोलिसांच्‍या मदतीने शिवरायांचा पुतळा हटवण्यासाठी हालचाली करत आहेत. हा पुतळा हलवला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

शिवप्रेमी नागरिकांनी म्हापशाचे निरीक्षक परेश नाईक यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रशांत वाळके, जयेश थळी, सिद्धार्थ मांद्रेकर, तुषार टोपले, रूपेश राऊत यांचा समावेश होता. शिवरायांचा पुतळा स्थानिक युवकांनी उभारला असला तरी भविष्यात त्याची जबाबदारी ‘स्वराज्य गोमंतक’ संस्था घेणार आहे. तसेच या पुतळ्यासंदर्भातील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात येतील, असे पोलिस निरीक्षकांसमोर स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात स्थानिक युवकांची सतावणूक करू नये, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT