Margaon Fish Market  Dainik Gomantak
गोवा

Unhygienic Fish: परराज्यातील मासे गोमन्तकीयांच्या आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक

स्वच्छता आणि गुणवत्ता चाचणी होत नसल्याने स्थानिक उपस्थित करताहेत प्रश्न, परिसरात दुर्गंधी

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पावसाळ्यात गोव्यातील मासेमारी बंद असल्याने शेजारच्या राज्यातून मासे विक्रीसाठी गोव्यात येत आहेत. मात्र, परराज्यातून येणा-या या माशांची स्वच्छता आणि गुणवत्ता (Unhygienic Fish) याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे परराज्यातून येणा-या मासे गोवा वासियांच्या (Goans) आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मडगाव रेल्वे स्थानकावर (Margao Railway Station) येणा-या सीफूडची फॉर्मेलन तपासणी केली जात नाही. तसेच, फलाटावर ठेवलेल्या थर्माकोलच्या बॉक्समधून परिसरात दुर्गंधी पसरते. मडगाव रेल्वे स्थानकावर मासळीची वाहतूक आणि विक्रीचे नियम सर्सासपणे डावलले जात आहेत. असे येथील स्थानिक नागरिक सांगतात. त्यामुळे बाहेर येणारे सीफूड किती आरोग्यदायी असेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

थर्माकोलच्या बॉक्समधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी फलाटावर पडत असल्याने, सर्व परिसरात दुर्गंधी पसरते. केरळ व इतर राज्यातून येणारे मासे यांची कोणत्याही प्रकारची स्वच्छता तसेच गुणवत्ता चाचणी केली जात नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी (South Goa) कार्यालयाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) या विषयात तात्काळ लक्ष घालण्याची सूचना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT