Indian Python At Goa Dainik Gomantak
गोवा

Panjim News: गाडी चालवताना अचानक हातावर आला साप; भितीने उडाली गाळण

Indian Python At Goa: स्कूटरच्या हेडलाईटच्या जागेत अजगर बसला होता

गोमन्तक डिजिटल टीम

सांतिनेज - पणजी येथे एका कार्यालयासमोर उभ्या करून ठेवलेल्या स्कूटरमध्ये अजगर सापडण्याची घटना काल रात्री १२.२० वाजता घडली. पणजीत एका कार्यालयात काम करणारा कर्मचारी रात्री आपले काम संपवून स्कूटरवरून घरी परतत असताना अचानक स्कूटरच्या हॅण्डलवरील त्याच्या हातावर साप अवतरला आणि त्याची भीतीने गाळणच उडाली. दुसऱ्या दिवशी मेकॅनिकने ती स्कूटर खोलल्यानंतर तो अजगर असल्याचे उघडकीस आले.

या कर्मचाऱ्याने स्कूटर सांतिनेज येथील आपल्या कार्यालयासमोर उभी करून ठेवली होती. त्या स्कूटरच्या हेडलाईटच्या जागेत तो अजगर जाऊन बसला होता.

रात्री १२.२० वाजता नेहमीप्रमाणे हा कर्मचारी आपली स्कूटर सुरू करून घरी जात असताना काही अंतरावर गेल्यानंतर वाटेत त्याच्या हातावर काही तरी मऊ मऊ आणि थंड लागत असल्याची जाणीव झाली आणि त्याने पाहिले तर काय चक्क त्याच्या हातावर साप वळवळत असल्याचे दिसले.

यावेळी घाबरलेल्या त्या कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता आपला हात जोरात झटकला. त्याबरोबर तो साप खाली पडेल असे त्याला वाटले होते, परंतु तो साप खाली न पडता मागे सरकला आणि पुन्हा स्कूटरच्या हेडलाईटच्या जागेत जाऊन बसला.

कर्मचाऱ्याने रस्त्यावरच कशीबशी स्कूटर थांबवली आणि हॅण्डलच्या दोन्ही बाजूंच्या फटीतून पाहिल्यानंतर तो अजगर हेडलाईटच्या मोकळ्या जागेत असल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्याने तो अजगर स्कूटरमधून जावा म्हणून दोन्ही बाजूने काठी घालून प्रयत्न केले, पण तो त्यातून बाहेर पडत नव्हता. शेवटी दुसऱ्या दिवशी मेकॅनिकला आणून तो अजगर स्कूटरमधून बाहेर काढण्यात आला.

पणजीत सापांचे दर्शन

सांतिनेज - पणजी परिसरात नेहमीच साप आढळून येतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने सांतिनेज नाल्यातील साप सांतिनेज परिसरातील गटारांत येतात. विशेष म्हणजे या गटारांवर लाद्या बसविण्यात आल्या आहेत, परंतु दोन्ही लाद्यांमध्ये मोठे अंतर आहे. त्यातून ते साप बाहेर रस्त्यावर येतात किंवा वाहनांत घुसतात. त्यामुळे गटारांवर फट न ठेवता लाद्या बसविण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT