Margao PWD Maintainance Work Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगावात फांद्या कापणे, नाले स्वच्छतेला गती

MLA Digambar Kamat: मडगाव भागात आमदारांच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी

गोमन्तक डिजिटल टीम

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे शनिवारी (ता.६) मडगावात विविध ठिकाणी धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्याच्या व नाले स्वच्छ करण्याच्या मोहिमेला चालना मिळाली. मडगावमधील रहदारीचा प्रमुख रस्ता आबे फारियावरील धोकादायक झाडांच्या त्याचबरोबर जुन्या बाजारातील सत्र न्यायालयीन इमारतीजवळ तसेच होली स्पिरीट चर्चजवळील झाडांच्या फांद्या कापल्या.

राष्ट्रीय महामार्ग खात्यातर्फे आबे फारिया रस्त्यावरील नालेही शनिवारी स्वच्छ करण्यात आले आहेत. या नाल्यांमध्ये बाटल्या, कपडे एकत्रित झाल्याने पाण्याचा प्रवाह व्यवस्थित होत नव्हता, त्यामुळे मोठा पाऊस पडला तर पाणी रस्त्यावरून वाहून घरांमध्ये शिरत होते. घरात पाणी शिरण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

तसेच काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर मोठा वृक्ष उन्मळून पडला होता. शुक्रवारी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या परिसराची पाहणी करून झाडांच्या फांद्या कापण्याचा व नाले स्वच्छ करण्याचा आदेश दिला. शनिवारी या कामाला गती मिळाली. येथील परिसरातील नागरिकांनी आपल्या जागेतील झाडांच्या फांद्या स्वेच्छेने कापून घेतल्या.

फांद्या कापण्यास विरोध का?

धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यास काहीजण का विरोध करतात, असा प्रश्र्न पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केला आहे. काही लोक स्वेच्छेने झाडे व झाडांच्या फांद्या कापून घेतात तर काही लोक त्यास विरोध करतात. त्यामुळे सरकारने नेमके काय करावे, हा प्रश्न उपस्थित होतो. काही समाजकार्यकर्त्यांनी व पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन झाडांच्या फांद्या कापण्यास विरोध दर्शविला, यासंदर्भात ते बोलत होते. साबांखाचे कंत्राटदार झाडे मुळासकट कापत नाहीत, तर केवळ रस्त्यावरील धोकादायक फांद्या कापतात. यात गैर काय, असे सिक्वेरा यांनी विचारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

SCROLL FOR NEXT