Nilesh Cabral Dismissed Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral Dismissed: मोठी बातमी! अखेर काब्राल बडतर्फ, सिक्वेरांचा संध्याकाळी शपथविधी!

आलेक्स सिक्वेरांचा आज संध्याकाळी शपथविधी

Kavya Powar

Nilesh Cabral Dismissed: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचा 345 पदांचा कथित भरती घोटाळा भाजप सरकारवर शेकला असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली.

उपलब्ध माहितीनुसार, आज (रविवार) काब्राल यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले असून आलेक्स सिक्वेरांचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काल रात्री, आलेक्स सिक्वेरा यांनी गोमंतकशी संवाद साधला. यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून मला मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा मी ऐकतोय. पण मला अजून मंत्रीपद मिळालेलं नाही. मला कॉंग्रेसची पद्धत माहिती आहे; पण भाजपात मी अजून नवीन आहे. माझं मुख्यमंत्र्यांनी बोलणं झालंय पण त्यांनी मला मंत्रीपदाबाबत काहीही सांगितलेलं नाही.

दरम्यान, बडतर्फ केल्याच्या माहितीनंतर कुडचडेमध्ये काब्रालांचे समर्थक एकवटले आहेत. यावर मुख्यमंत्री काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भूतकाळात डोकावताना...

2021 साली तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा 345 पदांचा हा घोटाळा सरकारवर शेकला. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करून त्या पदांसाठी नव्याने अर्ज करण्याची संधी नव्या अभियंत्यांना दिली असती व लोकसेवा आयोगामार्फत ती प्रक्रिया पूर्ण केली असती, तर सरकारवर ही दुसऱ्यांदा नामुष्की ओढवली नसती!

सूत्रांच्या मते, मुख्यमंत्री प्रमोद सावंत संपूर्णतः सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या ‘प्रामाणिकपणा’वर विसंबून राहिले. परंतु त्यांची दुसरी चूक झाली ती म्हणजे, त्यांनी आश्वासन देऊनही पाऊसकर यांच्या कारकिर्दीतील घोटाळ्याचा अहवाल गुप्त ठेवला.

सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली; परंतु तो अहवाल सरकारवर निवडणुकीच्या काळात शिंतोडे उडू नयेत म्हणून गुलदस्त्यात ठेवण्यात आला.

निवडणुकीनंतर प्रमोद सावंत सरकार पुन्हा अधिकारावर आले व लोक तो घोटाळा विसरले; परंतु सावंत यांनी तो अहवाल उघड केला असता तर दुसऱ्यांदा त्यांच्या सरकारवर शिंतोडे उडाले नसते.

कुडचडेत ‘कही खुशी कही गम’

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरून खाली उतरण्याचे आदेश पक्षश्रेठींनी दिल्यानंतर समाज माध्यमावरून झळकताच कुडचडे मतदारसंघात लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वृत्तामुळे कुडचडेत ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली असून लोक उघडपणे काहीच बोलताना दिसत नाहीत.

मात्र काब्रालांचे समर्थक सध्या सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT