Digambar Kamat Alt Monte Society Dainik Gomantak
गोवा

मोतीडोंगर पायथ्याशी संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून पाहणी

Digambar Kamat Alt Monte Society: मडगाव येथील मोती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आल्त मोंत सोसायटी शेजारील काँक्रीट भिंतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: मडगाव येथील मोती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आल्त मोंत सोसायटी शेजारील काँक्रीट भिंतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या बांधकामाची पाहणी रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केली. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या मध्यात या भागात माती हळूहळू खाली येत होती. मात्र, त्यावेळी तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती.

यावेळी मंत्री कामत यांनी सांगितले की, या जुन्या इमारती आहेत. ही भिंत कोसळल्यास परिसरातील सर्व इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे जलस्त्रोत खात्यामार्फत काँक्रीट भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले.

सुरुवातीला एका कंत्राटदाराने नकार दिल्याने कामास विलंब झाला. मात्र, सध्या कंत्राटदाराने चांगल्या प्रकारे काम केले असून येत्या दहा दिवसांत काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिक रहिवासी मारियो आल्मेदा यांनी मंत्री कामत यांच्याकडे पाठपुरावा करून या भिंतीचे काम सुरू करवून घेतले. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याने आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

५० लाखांचा खर्च

या इमारती उभारल्या तेव्हा बिल्डरांनी तेथील चिऱ्याच्या भिंती तशाच ठेवल्या होत्या. त्या काँक्रीटने बांधून घेणे आवश्यक होते. आता या कामासाठी अंदाजे ५० लाख खर्च येणार आहे, असे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT