Purumentachem fest Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem: पुरूमेंताचे फेस्त संपले, पण फेरी हटेना! नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास, अस्वच्छतेमुळे साथरोगांची भीती

Purumentachem fest: बाजारातील सर्वच रस्त्यांवर फेरीची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे चारचाकी सोडाच, दुचाकीसुद्धा उभी करणे कठीण होऊ लागल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

Sameer Panditrao

सांगे: येथील पुरूमेंताच्या फेस्तानिमित्त भरविलेली फेरी फेस्ताचा निर्धारित कालावधी संपल्यानंतरही आठ दिवस सुरू आहे. याविषयी सांगे पालिका मंडळाने मौन धारण केले आहे. मात्र, या फेरीमुळे वाहनचालक तसेच कामानिमित्त सांगेत येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा बराच त्रास सहन करावा लागत आहे.

बाजारातील सर्वच रस्त्यांवर फेरीची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे चारचाकी सोडाच, दुचाकीसुद्धा उभी करणे कठीण होऊ लागल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

दरवर्षी पुरूमेंत फेस्ताची फेरी आठ दिवस असते; पण यंदा फेरी संपून आठ दिवस होत आले तरी फेरी हटविण्यात आलेली नाही. काही दिवसांनी शाळा, हायस्कूल सुरू होणार असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होईल. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे.

फेरीमधील कचरा वेळीच न हटविल्यास पावसाळ्यात साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण शहरात फेरीचा कचरा पडलेला आहे. शिवाय बाजारात नेहमी येणारे ग्राहक, नोकरदार तसेच कार्यालयीन कामासाठी येणाऱ्यांना वाहने उभी करताना कुचंबणा सहन करावी लागत आहे.

सांगेचे मामलेदार आणि पालिका अधिकारी सिद्धार्थ प्रभू यांनी यात लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावी आणि फेरीची जागा रिकामी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्यावर फेरी नसली तरी वाहनचालकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत पाऊस पडूनही सर्व काही व्यवस्थित झाले आहे. यापुढे कोणताही अनर्थ घडू नये, याची दक्षता म्हणून शहरातील रस्ते वाहतुकीस मोकळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पालिका मंडळाचे मौन

वास्तविक ही फेरी आठ दिवसांची असते. आता आठ झाले तरी पालिका इमारतीसमोर भरलेली फेरी आणि वाहनचालकांना होणारा त्रास पाहूनही पालिका मंडळ गप्प राहात असल्याचे कारण नागरिकांना समजलेले नाही. हीच फेरी मडगावच्या फेस्ताला जाते. मडगावचे फेस्त आठ जूनला होणार आहे. तोपर्यंत फेरीवाले हटणार नाहीत, म्हणून पालिका मंडळ डोळे बंद करून गप्प राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

पालिका प्रशासनासमोर आव्हान

फेरी हटविल्यानंतर दुकानदार मांडव उभे करण्यासाठी लागणारे साहित्य तिथेच टाकून देतात. डब्यात भरली जाणारी माती, प्लास्टिक कचरा ही सर्व घाण साफ करण्यासाठी पालिकेला अजून काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे सध्या भर पावसाळ्यात हायस्कूल, शाळा, शिशुवाटिका सुरू होण्याआधीच सर्व परिसर स्वच्छ करणे, हे पालिका प्रशासनासमोर आव्हान ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT