Goa Purple Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Purple Festival: पर्पल महोत्सवाचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण, नवी दिल्लीत मंत्री फळदेसाईंची आयोजनासंदर्भात चर्चा

Purple Festival Invitation To Central Ministers: राज्यात होणाऱ्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नवी दिल्लीला शिष्टमंडळासह अधिकृत भेट दिली.

Sameer Amunekar

Purple Festival Goa: राज्यात होणाऱ्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नवी दिल्लीला शिष्टमंडळासह अधिकृत भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांना महोत्सवासाठी निमंत्रणही दिले.

या शिष्टमंडळात दिव्यांगजन राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांचाही समावेश आहे. या शिष्टमंडळाने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद, समाजकल्याणमंत्री रविंद्र सिंग यांचीही भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री गुप्ता यांना महोत्सवाचे औपचारिक निमंत्रण दिले.

यावेळी गुप्ता यांनी या कार्यक्रमाविषयी स्वारस्य दाखविले. तसेच अशा प्रकारच्या महोत्सवाचे नवी दिल्लीत आयोजन करण्यासाठी पाठबळ व मार्गदर्शन गोव्याच्या समाजकल्याण खात्याने उपलब्ध करावे अशी विनंती केली.

यावेळी केंद्र सरकारच्या दिव्यांगजन खात्याचे अतिरिक्त सचिव मनमीत कौर नंदा, उप महासंचालक रिचा शंकर, आर्टिफिशियल लिंब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रवीण कुमार, पंकज द्विवेदी, प्रियांका सिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT