Goa News | Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'पर्पल फेस्ट'ची प्रक्रिया सुरु- सुभाष फळदेसाई

Goa News: ''पर्पल फेस्ट'' साठी नोंदणी लिंक राज्य दिव्यांगजन आयोगाच्या समाजमाध्यमांच्या संकेतस्थळावर प्रसारित केली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: दिव्यांगजनांसाठी पुढील वर्षी पणजीत जानेवारी महिन्यात 6 ते 8 या तीन दिवसीय ‘दी पर्पल फेस्ट'' या महोत्सवात सुमारे पाच हजार लोक सहभागी होतील. या महोत्सवात सहभागी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, ऑनलाईनद्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, त्यामुळे या महोत्सवात दिव्यांगासह इतरांनाही सहभागी होता येणार असल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात झालेल्या या परिषदेस राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हझिक आणि समाजकल्याण संचालनालय संचालक संध्या कामत उपस्थित होत्या.

फळदेसाई म्हणाले की, हा कार्यक्रम गोव्यातील प्रतिनिधी, प्रदर्शक, देशभरातील प्रसारमाध्यमे आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्या मोफत आहे. देशभरातील इतर प्रतिनिधी आणि प्रदर्शक यांना एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

दिव्यांग सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था किंवा इतर संस्थांना या शुल्कामध्ये 50 टक्के सूट दिली जाणार आहे. त्यासाठी दहापेक्षा जास्त सदस्यांचा सहभाग अनिवार्य आहे. ''पर्पल फेस्ट'' साठी नोंदणी लिंक राज्य दिव्यांगजन आयोगाच्या समाजमाध्यमांच्या संकेतस्थळावर आणि आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसारित केली जाणार आहे.

तसेच, या परिषदेत सुमारे पाच हजार लोक सहभागी होतील, अशी आशा आहे. जे अर्ज भरून घेतले जाणार आहेत, त्यात संबंधितांना लागणाऱ्या सुविधा नमूद करणे आवश्‍यक आहेत. त्यानुसार त्या व्यक्तीस त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याशिवाय बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींच्या राहण्याची सोयही केली जाणार आहे.

महोत्सवातील कार्यक्रमाची रूपरेषा

  • पर्पल थिंक टँक सर्वसमावेशक शिक्षण आणि रोजगार यावर चर्चासत्र

  • पर्पल फन: ब्लाइंड कार रॅली, पक्षी निरीक्षण, मंदिरे आणि चर्च यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट यांसारख्या विविध मनोरंजक उपक्रम.

  • पर्पल एक्सपिरिअन्स झोन हा विशिष्ट लोकांच्या गटासाठी एक शिकण्याचा अनुभव असेल. ज्यात दिव्यांगांसमोरील आव्हाने, त्यांचे जीवन या गोष्टी समजावली जातील.

  • पर्पल एक्झिबिशनः अत्याधुनिक उपकरणे, दिव्यांग व्यक्तींनी बनवलेली उत्पादने, लाइव्ह आर्ट कॅम्प आणि विविध उपक्रमांचे विविध स्टॉल असतील.

  • पर्पल रेनः नामवंत कलाकारांचे विविध कार्यक्रम, संगीत मैफिली, नृत्य सादरीकरण, स्टँड-अप कॉमेडी आदींचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

Goa Live Updates: महादेव आरोंदेकर पंचायत संचालकपदी

Goa Politics: खरी कुजबुज; खरेच ‘हार’चे ‘आ’ झाले?

SCROLL FOR NEXT