Quepem Ganeshotsav Coupon Dainik Gomantak
गोवा

Quepem: केपेत दीड लाख कुपनची विक्री; पहाटेपासून रांगा

Quepem Ganeshotsav Coupon: केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही सर्व कुपन अवघ्या चोवीस तासांत विकली गेली

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: आलिशान चारचाकींची स्वप्ने पाहणाऱ्या लोकांनी पहाटे ३ वाजल्यासून केपे गाठले. केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही सर्व कुपन अवघ्या चोवीस तासांत विकली गेली. एखाद्या गणेशोत्सव मंडळाचा हा एक विक्रमच ठरावा. आज सकाळी ७ वाजता देणगी कुपन विक्री खुली करण्यात आली होती.

केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची देणगी कुपन खरेदी करण्यासाठी दरवर्षी लोकांची झुंबड उडते. लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळाने यावर्षी बोरीमळ-केपे येथे विक्री काउंटर सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद मिळाला. यावर्षी दीड लाख कुपन विक्रीसाठी काढली गेली. प्रत्येक कुपनची किंमत ही ५०० रुपये होती. संध्याकाळी सात वाजता सर्व कुपन संपल्याचे मंडळाने जाहीर केले.

गेल्या वर्षी एक लाख कुपन

गेल्यावर्षी केपेतील या गणेशोत्सव मंडळातर्फे १ लाख कुपन छापण्यात आली होती. प्रत्येक कुपनची किंमत ही ३०० रुपये इतकी होती. यावर्षी दीड लाख कुपन छापण्यात आली असून प्रती कुपन ५०० रुपये अशी किंमत आहे. गेल्या वर्षी सुद्धा सर्व कुपन हे दोन दिवसांत संपली होती. यावर्षी सुद्धा मंडळाच्या या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

केपेतील गणेश मंडळाची खासियत

राज्यात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यातील बऱ्याच मंडळांकडून दरवर्षी देणगी कुपन वितरीत केली जातात. परंतु ही कुपन विक्री करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ येते; पण केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आपली देणगी कुपन विक्री करण्यासाठी दोन दिवससुद्धा लागत नाहीत. ही तिकिटे घेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

SCROLL FOR NEXT