गोवा

'सहा राज्य, एक बाजारपेठ'; गोवासह विविध राज्य मंडई, कोल्ड स्टोअर्स करणार शेअर, शेतकऱ्यांना होणार फायदा

वाढता खर्च आणि कमी उत्पन्नामुळे, शेती आता फायदेशीर व्यवसाय राहिलेली नाही.

Pramod Yadav

सहा राज्यांनी त्यांच्या मंडई, कोल्ड स्टोअर्स आणि गेस्ट हाऊस एकमेकांना देण्यासाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ आणि योग्य किंमत मिळू शकेल, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी चंदीगड येथे सहा राज्यांच्या मंडी मंडळांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत या संदर्भात तोडगा काढण्यात आली.

पंजाब व्यतिरिक्त हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि आसाम या राज्यांचा या बैठकीत समावेश होता.

शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या किफायतशीर किंमत मिळावी यासाठी, तसेच आंतरराज्यीय व्यापाराला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी, सर्व राज्यांनी खरेदीसाठी एक समान व्यासपीठ विकसित करण्यासाठी हातमिळवणी केली पाहिजे, असे भगवंत मान यावेळी म्हणाले.

वाढता खर्च आणि कमी उत्पन्नामुळे, शेती आता फायदेशीर व्यवसाय राहिलेली नाही. उत्पादनाच्या विपणनासाठी एक समान व्यासपीठाची कल्पना विकसित केली गेली, तर ते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले.

हरियाणा राज्य कृषी विपणन मंडळाचे अध्यक्ष आदित्य देवी लाल चौटाला यांच्या म्हणण्यानुसार, मान यांनी याच मुद्द्यावर शुक्रवारी हरियाणाच्या पंचकुलामध्ये आयोजित केलेल्या आंतरराज्य परिषदाप्रमाणे आंतरराज्य परिषद घेण्याचे आश्वासन दिले आहे.

पंचकुला परिषदेत, हरियाणाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जेपी दलाल यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सर्व राज्य कृषी विपणन मंडळांनी सामायिक निधी तयार करण्याच्या गरजेवर भर देत पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या महत्त्वावरही भर दिला. दलाल यांनी विविध राज्यांतील मार्केटिंग आणि मंडी बोर्ड यांच्यात सहकार्याची भूमिका मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT