Ranji Cricket Trophy Dainik Gomantak
गोवा

Ranji Cricket Trophy: पंजाबने उडवला गोव्याचा धुव्वा; तासाभरातच विजयाला गवसणी

नेहाल वधेराच्या आक्रमकतेमुळे १८.३ षटकांतच विजय

Kishor Petkar

Ranji Cricket Trophy: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यावेळच्या मोहिमेतील पहिला विजय नोंदविताना पंजाबने रविवारी सकाळी गोव्याचा धुव्वा उडविला आणि सहा विकेट राखून सहज बाजी मारली. डावखुऱ्या नेहाल वधेरा याच्या आक्रमकतेच्या बळावर पाहुण्या संघाने १८.३ षटकांतच ४ बाद ९६ धावा करून आवश्यक लक्ष्य गाठले.

पर्वरी येथील मैदानावर एलिट क गटात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळी तासाभरात गोव्याचा खेळ खल्लास झाला. मयांक मार्कंडे धावबाद झाल्यानंतर अनुभवी अनमोलप्रीत सिंग (१२) याला हेरंब परब याने दीपराज गावकर याच्याकरवी झेलबाद झाले.

९४ धावांच्या आव्हानासमोर पंजाबची ४ बाद ३८ अशी स्थिती झाल्यानंतर गोव्याच्या गोटात थोडी खुशी होती, मात्र आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या २३ वर्षीय नेहालने टी-२० क्रिकेट शैलीत मुक्तपणे फलंदाजी केली.

त्याने २७ चेंडूंतच पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. नेहालने प्रभसिमरन सिंग (१९) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ३० चेंडूंतच ५८ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे पर्वरीतील मैदानावरील सर्वांत कमी कालावधीचा सामना नोंदीत झाला.

गोव्याच्या दुसऱ्या डावात ४८ धावांत ५ गडी बाद करणारा पंजाबचा २५ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज प्रेरित दत्ता सामन्याचा मानकरी ठरला. पंजाबचा हा चार लढतीतील पहिला विजय असून त्यांचे आता १० गुण झाले आहेत. पुढील लढतीत पंजाब संघ चंडीगडविरुद्ध खेळेल. गोव्याला चार लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे चार गुण कायम राहिले. शुक्रवारपासून (ता. २) पर्वरी येथेच बलाढ्य तमिळनाडूविरुद्ध गोव्याचा सामना होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः सर्वबाद १०४

पंजाब, पहिला डाव ः सर्वबाद १९०

गोवा, दुसरा डाव ः सर्वबाद १७९

पंजाब, दुसरा डाव (२ बाद १५ वरून) ः १८.३ षटकांत ४ बाद ९६ (मयांक मार्कंडे ८, अनमोलप्रीत सिंग १२, नेहाल वधेरा नाबाद ४९, प्रभसिमरन सिंग नाबाद १९, दर्शन मिसाळ ९-०-३९-१, हेरंब परब ७-०-३२-१, मोहित रेडकर २.३-०-२५-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT