IND vs ENG: पोपचं द्विशतक थोडक्यात हुकलं! हैदराबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर 231 धावांचे आव्हान

India vs England: इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Ollie Pope
Ollie PopeX/ICC

India vs England, 1st Test at Hyderabad:

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादला सुरु आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी 102.1 षटकात 420 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला 230 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ऑली पोपने सर्वाधिक 196 धावांची खेळी केली. त्याच्याच रुपात इंग्लंडने या डावातील शेवटची विकेट गमावली.

Ollie Pope
IND vs ENG: जो रुटचा भारताविरुद्ध मोठा रेकॉर्ड; जगातील दिग्गज फलंदाजांना टाकले मागे

या सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी 78 व्या षटकापासून आणि ६ बाद 316 धावांपासून खेळायला सुरुवात केली होती. यावेळी ऑली पॉप 148 धावांवर आणि रेहान अहमद 16 धावांवर नाबाद होता. त्यांनी सुरुवात चांगली केली. पण रेहानला 28 धावांवरच 83 व्या षटकात बुमराहने बाद केले.

यानंतर पदार्पणवीर टॉम हार्टलीने ऑली पोपला चांगली साथ देताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडने 400 धावांचा टप्पा सहज ओलांडला. पण 100 व्या षटकात हार्टली 34 धावांवर बाद झाला, पाठोपाठ वूडनेही शुन्यावर विकेट गमावली. अखेर बुमराहने पोपला बाद करत इंग्लंडचा डाव संपवला. पोपने 278 चेंडूत 21 चौकारांसह 196 धावांची खेळी केली.

Ollie Pope
IND vs ENG: अश्विनच्या 'ट्रॅप' मध्ये अडकला बेन स्टोक्स; डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत नकोसा रेकॉर्ड केला नावावर

दरम्यान, चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडकडून दुसऱ्या डावात सलामीवीर बेन डकेटने 47 धावांची खेळी केली. तसेच झॅक क्रावलीने 31 धावांची खेळी केली, तर बेन फोक्सने 34 धावांची खेळी केली होती.

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली.

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 64.3 षटकात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 121 षटकात सर्वबाद 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com