Pune Drug Racket Goa Connection 
गोवा

Pune Drug Racket Goa Connection: चार हजार कोटींचे अमली पदार्थ रॅकेट; सांगलीतून गोव्यात व्हायचा पुरवठा

Pune Drug Racket Goa Connection: सांगलीतून गोव्यात अमली पदार्थाचा पुरवठा केला जात होता, असे तपासातून समोर आले आहे.

Pramod Yadav

Pune Drug Racket Goa Connection

पुण्यात तब्बल 4000 कोटींच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या रॅकेटचे पुढे सांगली कनेक्शन समोर आले होते, सांगलीच्या कुपवाड येथून 300 कोटींचे 130 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

आता या अमली पदार्थ रॅकेटचे गोवा कनेक्शन समोर आले असून, सांगलीतून गोव्यात अमली पदार्थाचा पुरवठा केला जात होता, असे तपासातून समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी इतिहासातील सर्वात मोठ्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सांगलीतील कुपवाड येथून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले होते. येथे मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटी रुपये किंमतीचे 140 किलो अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणात आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

पोलिसांनी कुपवाडमधील स्वामी मळा येथील गोडाऊनवर छापेमारी केली असता मीठाच्या पोत्यात अमली पदार्थ लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. यातील काही प्रमाणात माल गोव्यात विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो अमली पदार्थ जप्त केले. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि दिल्लीत कारवाई करत पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले.

पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु झाला. त्यानंतर विविध ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT