Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पुण्यातील युवतींची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

Goa Crime News: फोंड्यात एकाची चौकशी : अनेकांना घातला गंडा

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मॅट्रिमोनिएल साईटवरून अनेक युवतींना लग्नाच्या आमिषावरून फसवण्याचे प्रकार घडत असून युवतींनी अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. फोंडा पोलिस स्थानकाच्या कक्षेतील बाजारमळ-कोटवाडा, कुर्टी येथील एका संशयिताला अशाच आरोपावरून हिंजवडी (पुणे) पोलिसांनी अटक केली असून त्याची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे.

15 ऑक्टोबरला संशयित जावेद काझी (वय 35) याला फोंडा पोलिसांच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी अटक केली होती. संशयित जावेद हा कुर्टीतील रहिवासी असून त्याने महाराष्ट्रात विशेषतः पुण्यातील अनेक भागांत आपण खाण व्यवसायात असल्याचे भासवून लग्नाला इच्छुक युवती व त्यांच्या कुटुंबीयांना फसवल्याची तक्रार कोंढवा व हिंजवडी पोलिस स्थानकात सुरवातीला नोंदवली होती. या तक्रारीनुसार संशयित जावेदला गोव्यातून अटक करण्यात आली होती.

म्हणे, मी उद्योजक

लग्नाच्या साईटवर स्वतःची ओळख उद्योजक म्हणून त्याने करून दिली होती. महागडी गाडी घेऊनही तो फिरायचा. त्यामुळे युवती भुलायच्या. इच्छुक युवतींना हेरून तो त्यांना खोटी ओळख दाखवायचा. त्यामुळे भुललेल्या अनेक युवती आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये घेऊन पळ काढायचा. सध्या त्याची हिंजवडी पोलिस स्थानकात चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT