Pune tourist attempts to murder security guard in Goa Dainik Gomantak
गोवा

पुण्यातील पर्यटकाची गोव्यात गुंडगिरी; सुरक्षा रक्षकाला कारखाली चिरडून खून करण्याचा प्रयत्न

Goa Crime News: वारंवार गेट बंद करण्यावरुन झालेल्या वादातून कार चालकाने सुरक्षा रक्षकाला चिरडण्याचा प्रयत्न केला.

Pramod Yadav

म्हापसा: पुण्यातील पर्यटकाने गोव्यात गुंडगिरी करत सुरक्षा रक्षकाला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यात सुरक्षा रक्षकाचा हात आणि पाय तुटला असून, त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. हणजूण पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. मंगळवारी (०८ जुलै) सकाळी दहा वाजता वागातोर येथे ही घटना घडली.

उत्तम दास (वय ३०, रा, वागातोर, मूळ आसाम) असे या अपघातात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर, हणजूण पोलिसांनी याप्रकरणी सुजन चंद्रवदन मेहता (रा. लोणावळा, पुणे) याला अटक केली आहे.

संशयित सुजन गोव्यात पर्यटनासाठी आला होता. पर्यटक वागातोर येथील व्हिला अपार्टमेंटमध्ये थांबला होता.

व्हिला अपार्टमेंटमध्ये उत्तम दास सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. परिसरात येणाऱ्या ग्राहक आणि वाहनांसाठी गेट उघडण्याचे काम त्याच्याकडे होते. संशयित देखील कारमधून वारंवार ये – जा करत होता. दास गेटजवळ असताना संशयित दासने कार मागे घेत दासला चिरडण्याचा प्रयत्न केला. यात दास गंभीर जखमी झाला आहे. यात त्यांचा हात आणि पाय तुटल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत संशयित कार चालकाला चोप दिला. यानंतर जखमी सुरक्षा रक्षकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

वारंवार ये – जा करावी लागतेय त्यामुळे गेट बंद न करता उघडेच ठेवावे, असे संशयित म्हणत होता. त्याच रागातून त्याने कार सुरक्षा रक्षकाच्या अंगावर घालून त्याला चिरण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. हणजूण पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

SCROLL FOR NEXT