Varsha Usgaonkar: 'गोव्याची पोरगी, तू इथे कशी?' चक्क बाळासाहेबांच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; वाचा मजेदार किस्से

Varsha Usgaonkar Interview: मुंबईतील कलानगर येथे बाळासाहेबांच्या शेजारी राहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी किती खास होता हे त्यांनी सांगितलं
Varsha Usgaonkar Balasaheb Thackeray
Varsha Usgaonkar Balasaheb ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील एकेकाळी गाजलेल्या आणि आजही आपल्या सौंदर्य व अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या त्यांच्या मजेशीर आठवणींना उजाळा दिला आहे. गोव्यातून आल्यानंतर मुंबईतील कलानगर येथे बाळासाहेबांच्या शेजारी राहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी किती खास होता, हे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

बाळासाहेबांची २४ तास सुरक्षा आणि खेळकर स्वभाव

वर्षा उसगावकर कलानगरमध्ये बाळासाहेबांच्या घराजवळ राहायच्या. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरेंचं घर माझ्या अगदी शेजारी होतं. त्यामुळे मला चोवीस तास पोलिसांची सुरक्षा असायची. रात्री अपरात्री कलानगरमध्ये जाताना मला कधीच भीती वाटली नाही."

यापुढे बाळासाहेबांचा स्वभाव किती खेळकर आणि मार्मिक होता, याबद्दलही त्यांनी सांगितलं. "बाळासाहेब मला अनेकदा घरी बोलवायचे. गप्पा मारायचे, छान गोष्टी सांगायचे आणि जोक्सही सांगायचे. 'काय गं.. गोव्याची मुलगी. कशी काय गोव्यावरुन इथे आलीस? दामूकडे राहतेस तू..?' असे ते मला गंमतीने विचारायचे."

'कॅलरीशिवायची बिअर' आणि कलाकारांना फोन

बाळासाहेबांच्या विनोदी स्वभावाचा आणखी एक किस्सा वर्षा उसगावकर यांनी सांगितला. "एकदा मी आणि माझी आई त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हाही त्यांनी आम्हाला खूप हसवलं. मला आठवतंय, ते म्हणाले होते की, 'मी बिअर पितो, पण ही कॅलरीशिवाय असलेली बिअर आहे.' तेव्हा मी मनात विचार केला, 'बापरे! हे सगळ्यांना सांगून बिअर पितात.' असा त्यांचा गंमतीशीर स्वभाव होता," असं त्या म्हणाल्या.

Varsha Usgaonkar Balasaheb Thackeray
Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर गर्विष्ठ आहेत! काय होता लोकांचा समज? त्यांनीच दिले उत्तर Watch Video

बाळासाहेब ठाकरे कलाकारांना खूप महत्त्व देत असत, हेही वर्षा उसगावकर यांच्या बोलण्यातून दिसून येतं. त्या म्हणाल्या, "बाळासाहेब आमच्यासमोरच कलाकारांना फोन लावायचे आणि आमचंही त्यांच्याशी बोलणं करून द्यायचे. मला त्यांचा स्वभाव खूप आवडायचा."

'महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब'

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, "मला असं वाटायचं की बापरे, ज्यांच्याबद्दल एवढं लिहून येतं ते बाळासाहेब ठाकरे माझ्या शेजारी राहतात. त्यांचं मला रोज दर्शन होतं म्हणजे मी किती भाग्यवान आहे. महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे असंच ते समीकरण होतं."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com