Passport Dainik Gomantak
गोवा

Fake Passport: बनावट पासपोर्ट प्रकरणी पुणे पोलिस गोव्यात

Fake Passport: पणजी येथील पासपोर्ट कार्यालयातून बांगलादेशींनी कसे पासपोर्ट मिळविले याच्या तपासासाठी निगडी-पुणे येथील पोलिस गोव्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Fake Passport: पणजी येथील पासपोर्ट कार्यालयातून बांगलादेशींनी कसे पासपोर्ट मिळविले याच्या तपासासाठी निगडी-पुणे येथील पोलिस गोव्यात येणार आहेत. पुण्यातील निगडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान चक्क गोव्याच्या पासपोर्ट ऑफिसमधून विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढल्याचे उघडकीस आले आहे. रॉकी सामोर बरूआ (२८), जयधन अमिरोन बरूआ (२८), अंकुर सुसेन बरूआ (२६), रातुल शिल्फोन बरूआ (२८), राणा नंदन बरूआ (२५, सर्व रा. चित्तगॉंग, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बांधकाम मजूर म्हणून हे सारे गोव्यात राहात होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. गोव्यात असताना त्यांनी हे पासपोर्ट मिळविले आहेत. अन्य एका राज्यात एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी पकडले होते. त्याच्या जबानीत या संशयितांची नावे आल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेत निगडी येथे त्यांना पकडले.

या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणाही तपास करू लागल्या आहेत. या पाचपैकी तिघांनी विदेशात जाण्यासाठी गोव्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.

त्यानुसार गोव्याच्या पासपोर्ट कार्यालयाने पडताळणी करण्यासाठी ती माहिती पुण्याच्या पिंपरी-चिंचवड विभागातील पोलिस स्थानकात पाठवली होती. तिथून निश्चिती झाल्यानंतर त्यांनी पासपोर्ट जारी केला, असे या संशयितांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, गोव्याच्या पासपोर्ट विभागाने त्यांची कागदपत्रे घेताना नक्की काय तपासले आणि पुण्यातील संबंधित पोलिस स्थानकात त्याची पडताळणी कशी करण्यात आली, याचा तपास आता निगडी पोलिस करत आहेत.

वेलिंगकरांच्या आरोपात तथ्य

राज्यात ४० हजार बांगलादेशी राहात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभाष वेलिंगकर यांनी अलीकडेच केला होता. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; रुपेश नाईक आणि अनिकेत नावेळकरला अटक

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT