Goa Vacation Bus, Train, Flight Ticket Comparison Dainik Gomantak
गोवा

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Pramod Yadav

पणजी: दिवाळीची सुट्टी जवळ येत आहे. शाळा, महाविद्यालयांसह सरकारी कर्मचारी ते खासगी क्षेत्रातील देखील कामगारांना काही दिवस सुट्टी मिळते. सुट्टीच्या काळात अनेकजण विविध ठिकाणी ट्रीपचे नियोजन करत असतात.

हॉट डेस्टिनेशनमध्ये गोवा नेहमीच पहिली पसंती असते. पण, खर्चाचे नियोजन होत नाही आणि गोवा ट्रीप कॅन्सल होते. तर जाणून घेऊया गोव्याला जाण्यासाठी बस आणि विमानाने किती खर्च येईल.

बस प्रवास आणि खर्च

पुणे किंवा मुंबईतून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातही स्लिपर किंवा २ बाय २ सिटींग बसने प्रवासाचा पर्याय निवडल्यास प्रवास भाड्यात तफावत दिसू शकते.

पुणे ते गोवा बस प्रवास

पुण्यातून गोव्याला स्लिपर बसने जाण्यासाठी साधारण १४०० ते २००० रुपये तिकिटासाठी मोजावे लागतील. तर, २ बाय २ सिटींग बसच्या जाण्याचा पर्याय निवडल्यास ८००, ९०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. वरील दर ०१ नोव्हेंबरनुसार देण्यात आले आहेत. यात बदल होऊ शकतो.

Pune - Goa Bus Ticket

मुंबई ते गोवा बस प्रवास

मुंबईतून गोव्याला बस प्रवास काहीसा महागडा ठरु शकतो. स्लिपर कोचसाठी तुम्हाला २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात. तर सिटींगसाठी हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागू शकतात. यातही बसचा दर्जा आणि मुंबईतून बसण्याचे ठिकाण यावर देखील तिकीटात फरक पाहायला मिळू शकतो.

Mumbai - Goa Bus Ticket

ट्रेन प्रवास आणि खर्च

मुंबई ते गोवा ट्रेन प्रवास

पुणे किंवा मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी सर्वाधिक ट्रेन प्रवासाला पसंती दिली जाते. मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी स्लिपर कोचसाठी ४३५ रुपये पर्यंत पैसे मोजावे लागतील. तुम्ही जर तेजस व्हिस्टा डोममधून प्रवास करणार असाल तर त्याचे दर खाली जोडलेल्या फोटोत देण्यात आले आहेत.

Mumbai Goa Train Ticket
Mumbai Goa Train Ticket

पुणे ते गोवा ट्रेन प्रवास

पुण्यातून गोव्याला जाण्यासाठी गोवा एक्सप्रेसला पसंती देतात. गोवा एक्सप्रेसने गोव्याला जाण्यासाठी स्लिपर कोचसाठी साडे तिनशे ते चारशे रुपये खर्च येतो. सायंकाळी साडे पाच वाजता पुण्यातून निघणारी ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा वाजता वास्को द गामा येथे पोहोचते.

विमान प्रवास

पुणे ते गोवा

पुण्यातून विमानाने गोव्याला जाण्यासाठी ३,२०० ते ७ ते ९ हजार रुपये मोजावे लागतील. (ऑनलाईन संकेतस्थळावर एक नोव्हेंबरसाठी तपासलेल्या दरानुसार मिळालेली माहिती खाली जोडण्यात आली आहे.)

Pune Goa Flight Ticket
Mumbai Goa Flight Ticket

मुंबई ते गोवा विमान प्रवासासाठी ३,२०० ते ५,००० रुपये मोजावे लागणार आहेत. ऑनलाईन संकेतस्थळावरील माहितीनुसार विमान प्रवासाचे दर वरती जोडण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT