Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

Hina’s Cancer Battle Inspired by Elderly Woman in Goa: कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खाने मुंबईतील हाजी अली दर्ग्यात देखील नमाज पठण करुन दुआ मागितली.
Actress Hina Khan
Actress Hina KhanInstagram
Published on
Updated on

पणजी: अभिनेत्री हिना खान तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत आहे. दुर्धर आजाराचा सामना करणारी हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलिकडेच तिने गोवा ट्रीप केली. या ट्रीपमध्ये एका वृद्ध महिलेने तिला आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. याचा व्हिडिओ हिनाने तिच्या Instagram Account वरुन शेअर केला आहे.

अभिनेत्री हिना खानने 17 ऑक्टोबर रोजी गोव्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत असणारी महिलेचे नाव देवी असून, ती हिनाला समुद्रकिनाऱ्यावर भेटली. हिना लवकर बरी होईल, अशी प्रार्थना या महिलेने केली आहे. या महिलेने मला प्रेरणा दिल्याचे मत, हिनाने व्यक्त केले आहे.

'तुझ्यासाठी नेहमी प्रार्थना करते. तू बरी होशील. तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहावे, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. देव तुला आशीर्वाद देईल, बेटा', असे ही महिला या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हिना खानने पांढऱ्या रंगाची गोल टोपी घातली आहे.

Actress Hina Khan
लष्कर-ए-तैय्यबाच्या पाच दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक, मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

दुसऱ्या एका पोस्टमध्ये हिना खान हाजी अली दर्ग्यात जाताना दिसत आहे. तिने डोक्यावर हिजाब घातला आहे.

Actress Hina Khan
CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

कर्करोगाचा सामना करणारी हिनाची काही दिवसांपूर्वी केमोथेरपी करण्यात आली यात तिचे केस गेले, पापण्याही गेल्या होत्या. याचे फोटो देखील तिने पोस्ट केले होते.

अभिनेत्री हिना खानने मुंबईतील हाजी अली दर्ग्यातही जात प्रार्थना केल्याचे फोटो शेअर केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com