Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पुणेकर उद्योगपतीला गोव्यात 11 लाखांचा गंडा; घर दुरुस्तीच्या नावाखाली उकळले पैसे

Goa Crime News: उद्योगपती समीर भोसले यांनी घराचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी संशयितांना चेकच्या मदतीने ११ लाख रुपये देऊ केले.

Pramod Yadav

Goa Crime News

पणजी: घराचे नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या नावाखाली पुण्यातील एका उद्योगपतीची गोव्यात ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील उद्योगपतीने घरातील कामासाठी आगाऊ ११ लाख रुपये दिले मात्र, संशयित आरोपींनी काम न करता फसवणूक केली, असा आरोप उद्योगपतीने केला आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उद्योगपती समीर भोसले (रा. पुणे, महाराष्ट्र) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन पर्वरी पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित देविका आणि रेने यांनी या भोसले यांच्याकडून घर दुरुस्तीच्या कामासाठी ११ लाख रुपये घेतले. पण, काम न केल्याने त्यांच्याविरोधात भोसले यांनी पोलिसांत धाव घेतली.

उद्योगपती समीर भोसले यांचे पिळर्ण येथे एक जुने घर आहे. या घराचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी संशयितांना चेकच्या मदतीने ११ लाख रुपये देऊ केले. पैसे घेऊन देखील संशयितांनी घराचे काम केले नाही, असा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT