Seaweed Dainik Gomantak
गोवा

Seaweed: समुद्री शेवाळापासून लगदा व बायोप्लॅस्टिक!

Seaweed: शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू: पेपर, औषधेही तयार करणे शक्य

दैनिक गोमन्तक

धीरज हरमलकर

Seaweed: सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियानोग्राफीतर्फे समुद्री शेवाळपासून लगदा आणि बायोप्लॅस्टिक तयार करण्यावर शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. या समुद्री शेवाळाच्या उत्पादनाने पेपर, औषधे, खाद्यपदार्थ, बायोप्लॅस्टिक अशा अनेक गोष्टी तयार करणे शक्य होणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.

गेल्या आठवड्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियानोग्राफी यांच्या दोनापावला येथील कार्यालयात शाळकरी मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनात सीएसआयआरकडून संशोधन सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल समजले.

प्रदर्शनात याविषयी माहिती देणाऱ्या एका संशोधकाने सांगितले की समुद्री शेवाळ हे बहुपेशीय, मॅक्रोस्कोपिक म्हणजे सहज दिसणारे, वनस्पतींसारखी पाने, खोड किंवा मुळे नसणारी प्रजाती आहे. हे शेवाळ संपूर्ण जगाच्या महासागरात उथळ आंतरभरती क्षेत्र आहे तिथे विस्तारते.

गोव्यात काकरा येथे एक आणि तिसवाडी तालुक्यात आणखी दोन ठिकाणी शेवाळाच्या उत्पादनाचे काम चालू आहे. गोव्यासह महाराष्ट्रात १२, कर्नाटकात ५, तर केरळमध्ये १० ठिकाणी समुद्री शेवाळाचे उत्पादन होत आहे. हे शेवाळ, महागडी औषधे, फर्टीलायझर, अन्ननिर्मिती, कॉस्मेटक्स, रंग, कापड उत्पादन करण्यास मदत करेल. या समुद्री शेवाळवर संशोधन सुरू असून आम्ही अनेक शेतकरी मित्रांमध्ये याविषयी जागृती पुढे करणार असल्याचेही संशोधकाने सांगितले.

समुद्री शेवाळांचे प्रकार

  • ग्रीन क्लोरोफिटा (क्लोरोफिल ए आणि बीए)

  • रेड रोडोफायटा, क्लोरोफिल ए आणि बीटा कॅरोटीन)

  • ब्राऊन फयोफायटा (झँथोफिल रंगद्रव्य फ्युकोक्सॅन्थिन, क्लोरोफिल ए आणि सी (कोणतेही क्लोरोफिल बी नाही),

  • बीटा-कॅरोटीन आणि इतर झँथोफिल)

अधिक क्षारतेची जागा पोषक

शेवाळाच्या वाढीविषयी संशोधकाने सांगितले, की जागेची निवड आणि बियाणे साहित्य महत्त्वाचे आहे. समुद्री शेवाळाच्या वाढीसाठी २५ पीपीटीपेक्षा जास्त क्षारता असलेली जागा पोषक असते. पारदर्शक पाण्याने वालुकामय/ खडकाळ तळ, जागेवर प्रवेशयोग्यता, कमी मानववंशीय क्रियाकलाप जसे की नौकाविहार, मासेमारी अशा गोष्टी समुद्री शेवाळाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. समुद्री शेवाळ प्रजातीच्या उत्पादनासाठी ‘राफ्ट किंवा ट्यूब नेट’ प्रकारच्या पध्दतीचा वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT