Governor P. S. Sridharan Pillai: सरासरी दर 18 दिवसाला एका पुस्तकाचे प्रकाशन करत पाच वर्षात 100 पुस्तके राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रकाशित केली आहेत. कोविड काळात त्यांनी लेखनावरच लक्ष केंद्रित केले होते.
1973 मध्ये लेखनास सुरुवात केलेल्या राज्यपालांच्या 200 व्या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते राजभवनाच्या नव्या दरबार सभागृहात उद्या दुपारी 2 वाजता केले जाणार आहे.
राज्यपालांनी ‘वामन वृक्ष कला’ हे पुस्तक लिहिले आहे. ते त्यांचे २०० वे पुस्तक आहे. ‘बोन्साय’ ही पाच हजार वर्ष जुनी अशी भारतीय कला कशी आहे, याची माहिती संस्कृती श्लोकांचा अर्थ उलगडून दाखवून त्यांनी पुस्तकातून दिली आहे.
आजवर ‘बोन्साय’ ही जपानी कला आहे, असे मानले जात आहे. चीनमध्येही या कलेचा विकास व प्रसार झाला आहे. राज्यपालांनी १९७३ मध्ये लेखनास सुरुवात करताना कथा, कविता असे लेखन प्रकार हाताळले. त्यांचे पहिले पुस्तक मात्र कायदेविषयक होते.
‘केरळमधील भाडेविषयक कायदे’ हे त्यांचे पुस्तक 1985 मध्ये प्रसिद्ध झाले. 2018 मध्ये त्यांचे 100 वे पुस्तक ‘लोकशाहीसाठीचे काळे दिवस’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झाले. पहिली 100 पुस्तके प्रकाशित होण्यासाठी त्यांना 38 वर्षे लागली तर आणखीन 100 पुस्तके केवळ पाच वर्षात त्यांनी प्रकाशित केली आहेत.
दरबार सभागृहात सोहळा
या 200 पुस्तकांपैकी 130 पुस्तके ही मल्याळममधील आहेत. 70 पुस्तके इंग्रजीतील आहेत. 200 व्या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते राजभवनाच्या नव्या दरबार सभागृहात दुपारी २ वाजता केले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. भारतीय ऑलिपिंक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि साहित्यिक दामोदर मावजो निमंत्रित म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.