Public Medicine Centers  Dainik Gomantak
गोवा

Public Medicine Centers : तीन महिन्यांत इस्पितळांनी उघडावीत जन औषधी केंद्रे : आरोग्यमंत्र्यांचा आदेश

Public Medicine Centers : द.गो. जिल्हा इस्पितळात उद्‌घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Public Medicine Centers : सासष्टी, गरीबांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला माहिती आहे. पुढील तीन महिन्यांत गोव्यातील सर्व आरोग्य केंद्रे, इस्पितळांमध्ये जन औषधी केंद्रे उघडण्यासाठीचे आदेश आपण आरोग्य खात्याला दिले आहेत.

गोव्यात सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गोमंतकीय रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी इतर राज्यात जावे लागणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांनी सांगितले.

फातोर्डा-मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राचे उद्‌घाटन आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे व आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. या केंद्रामार्फत रुग्णांना १० ते ९० टक्के सवलतीच्या दरात जेनेरिक औषधांची विक्री केली जाईल.

ही योजना केंद्र सरकारने रसायनिक व खत मंत्रालय आणि फार्मास्युटीकल संचालनालयातर्फे कार्यान्वित केल्याचे अन्न व औषध खात्याच्या संचालिका डॉ. ज्योती सरदेसाई यांनी सांगितले.

याप्रसंगी आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी खात्याने हाती घेतलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय निरिक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की, ही सेवा दिवस-रात्र उपलब्ध असेल. रुग्णांना योग्य व सवलतीच्या दरात औषधे देणे हा या योजनेमागचा हेतू आहे.

ही योजना लोकप्रिय होत असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत देशात दहा हजार स्टोअर्स उघडण्यात आली आहेत व सरकारचे २५ हजार स्टोअर्स उघडण्याचे उद्दिष्ट आहे. ‘

सेवाही व रोजगारही’ अशी दुहेरी संकल्पना या योजनेमागे असून औषध विक्री करून रुग्णांची सेवा व त्याचबरोबर व्यवसाय असा त्याचा अर्थ आहे. ही औषधीय केंद्रे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे दिसून आले आहे.

- डॉ. ज्योती सरदेसाई,

संचालक, अन्न व औषध खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT