Bank Holiday on 22 January 2024
अयोध्या येथे सोमवारी 22 जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणपतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोव्यातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 22 जानेवारीला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यापाठोपाठच आता या दिवशी बँकाही बंद राहणार आहेत. प्राणपतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यातील सर्व मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक पंचायतींनी या दिवशी मद्यविक्री तसेच मांस - मासळीविक्रीवर बंदी घातली आहे. यादिवशी कुणीही घरात मांसाहार शिजवू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे उद्घाटन सोमवार 22 तारखेला होणार असून, या दिवशी प्रत्येकाला प्रत्यक्षात अयोध्येत जाणे शक्य होणार आहे.
मात्र आपण टप्प्याटप्प्याने सत्तरीतील जनतेला अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचे दर्शन घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.
याच पार्श्वूमीवर म्हापशात श्री रामरथ नगर फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी २१ रोजी संध्याकाळी 5 वाजता खोर्ली येथील सिद्धिविनायक मंदिरापासून प्रारंभ होईल. फेरीचा या समारोप रामरथ म्हापशातील श्री महारुद्र मंदिरात होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.