Goa State Wetlands Authority Public hearing Dainik Gomantak
गोवा

Maimolem Wetland Issue: शेतकऱ्यांचा ‘ओलसर जमीन’ करणाऱ्यांवर आक्षेप; मायमोळे शेतजमिनीवरील जनसुनावणी

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मायमोळे-वास्को येथील शेतजमिनीवरील जनसुनावणी प्राधिकरणातर्फे आज घेण्यात आली. यावेळी जमीनमालक, घरमालक, शेतकऱ्यांनी ‘ओलसर जमीन’ करणाऱ्यांवर आक्षेप घेऊन तीव्र विरोध दर्शविला. जनसुनावणीला वास्कोचे आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते. आता ही जनसुनावणी पुढे होणार आहे.

मायमोळे तळे नसून वायंगण शेतजमीन आहे व तिचे रुपांतर ‘ओलसर जमीन’ म्‍हणून करू नये असे यावेळी सांगण्‍यात आले. या जनसुनावणीला ५८ जमीनमालक, घरमालक, शेतकरी उपस्थित होते. तसेच राज्य ओलसर जमीन प्राधिकरणाचे प्रदीप सरमोकादम, ॲड. सपना मोर्डेकर, मुरगाव पालिका जैवविविधता मंडळाचे प्रमुख यतीन कामुर्लेकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांचीही उपस्थिती होती.

प्राधिकरणाने सुमारे २४४ जणांना नोटीस पाठवून जनसुनावणीला उपस्थित राहण्याचा आदेश जारी केला होता. त्‍यात शेतकरी तथा नगरसेवक लिओ रॉड्रिगीस यांचाही समावेश असून, त्‍यांनी शेतजमीन ‘ओलसर जमीन’ करण्यास आक्षेप घेतला. आमच्‍या कुटुंबीयांची सुमारे सात हजार चौ. मी. जागा आहे. ती ‘ओलसर जमीन’ घोषित केल्यास आम्हाला मोठा फटका बसणार आहे. कारण ओलसर जमीन केल्यास येथील जमिनीत बांधकाम करण्‍यास बंदी येऊ शकते. यासाठी सर्वप्रथम राज्य ओलसर प्राधिकरणाने आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी अशी मागणी त्‍यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT