Goa Wetlands : राज्यातील आणखीन 10 तळी पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित होणार

पाणथळ तळ्यांची एकूण संख्या 50 झाली आहे
Goa Tourism Development Corporation To Start Bus Mayem Lake
Goa Tourism Development Corporation To Start Bus Mayem LakeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Wetlands : गोवा राज्याच्या पाणथळ प्राधिकरणाच्या (GSWA) च्या तांत्रिक समितीने नुकतेच आणखी 10 तळी पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मसुदा अधिसुचित करण्यासाठी वेटलँड प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे.

त्यामुळे वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, 2017 अंतर्गत राज्यातील पाणथळ जमीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावांची संख्या 50 झाली आहे.

Goa Tourism Development Corporation To Start Bus Mayem Lake
Goa Crime: हैदराबादच्या दोघांना गोव्यात ठेवले ओलिस; 4 कोटी खंडणीची मागणी

पाणथळ जमीन म्हणून नियुक्त केलेल्या दहा तलावांच्या या नवीन यादीत नऊ दक्षिण गोव्यात आहेत तर एक उत्तर गोव्यात आहे.

तळावली तलाव (Talaulim lake), माकाझन तलाव (Macasana lake), आंबलूर तलाव (Ambulor lake), बांदोळे तलाव (Ban- dolem lake), कमला तलाव (Kamala lake), ओर्ली तलाव (Orlim lake), धुळापे तलाव(Dhulpe lake), करमळी तलाव, सपू टोमेन तलाव (Sapu Tomem lake) आणि मये तलाव (Mayem lake) हे तलाव आहेत.

Goa Tourism Development Corporation To Start Bus Mayem Lake
Goa News : डॉ. डोलोरेस डिसोझा यांच्या कामगिरीमुळे गोव्याच्या शिरपेचात 'मानाचा तुरा'

याशिवाय, पाणवठ्यांचे योग्य संवर्धन आणि संरक्षण सुनिश्चित करणारे वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, 2017, कॅरंबोलि तलाव (Carambolim) , सुलभत (Sulabhat), भाटी तलाव (उत्तर गोव्यातील), कोनेम तलाव (Conem), तरवले तलाव (Tarvalem) आणि पाली तलाव (Pali) (दक्षिण गोव्यातील) या सहा तलावांच्या अंतिम अधिसूचनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये, या सहा जलस्रोतांची यादी करणारी एक मसुदा अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. जेणेकरून त्यांना पाणथळ प्रदेश म्हणून घोषित करण्यासाठी सामान्य लोकांकडून अभिप्राय मिळावा. 20 डिसेंबर 2022 रोजी अधिसूचना कालबाह्य झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com