Mine Block Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: अडवलपाल खाण ब्लॉकसाठी आज होणार जनसुनावणी

Goa Mining: प्रशासकीय यंत्रणा सज्ज: मोठा पोलिस फौजफाटा तैनात

दैनिक गोमन्तक

Goa Mining:

अडवलपाल - थिवी खाण ब्लॉकसाठी उद्या (शुक्रवारी) जनसुनावणी होणार असून ‘ईआयए’ अहवाल आदी मुद्यावरून उद्याची जनसुनावणी तापण्याची शक्यता आहे. या जनसुनावणीकडे अडवलपालवासीयांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागून राहिले आहे.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उद्याच्या जनसुनावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीच्या निरीक्षणाखाली ही जनसुनावणी होणार आहे.

जनसुनावणी सुरळीत व्हावी यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल आणि खाणव्याप्त अडवलपालवासीयांची भूमिका यावरच जनसुनावणीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

डिचोलीत जनसुनावणी : अडवलपाल - थिवी खाण ब्लॉक फोमेंतो रिसोर्सीस कंपनीच्या ताब्यात असून या खाण ब्लॉकअंतर्गत डिचोली तालुक्यातील अडवलपाल आणि बार्देश तालुक्यातील थिवीतील भाग मिळून 36.2202 हेक्टर क्षेत्रफळ येत आहे. प्रति वर्ष ०.३ मिलीयन टन खनिज उत्खनन करण्यासाठी या खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. डिचोलीतील हिराबाई झांट्ये सभागृहात सकाळी १०.३० वाजल्यापासून ही जनसुनावणी होणार आहे. तत्पूर्वी ९ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT