Goa police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police : दारूची तस्‍करी रोखण्‍यासाठी बंदोबस्‍त; १० पोलिसांचे पथक

Goa Police : पोळे चेकनाक्‍यावर दिवस-रात्र वाहनांची तपासणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police :

मडगाव, लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर गोव्‍यातून कर्नाटकात दारू तसेच अन्‍य वस्‍तूंची तस्‍करी होऊ नये तसेच बाहेरूनही राज्यात अवैध वस्तू येऊ नयेत यासाठी काणकोण पोलिसांनी कडक उपाययोजना हाती घेतली असून पोळे-काणकोण येथील चेकनाक्‍यावर कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

कर्नाटकातून ये-जा करणाऱ्या प्रत्‍येक वाहनांची या चेकनाक्‍यावर कसून तपासणी करत असून दिवस-रात्र हा पहारा चालू आहे.

यासाठी दहा पाेलिसांचे पथक चेकनाक्‍यावर तैनात करण्‍यात आले आहे. वाहनांच्‍या हालचालीवर निगराणी ठेवण्‍यासाठी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात असून काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही गस्‍त चालू आहे.

या पथकात दोन साहाय्‍यक पोलिस निरीक्षक, एक हवालदार, दोन पोलिस शिपाई आणि तीन गृहरक्षक दलाचे जवान यांचा समावेश आहे.

तपासणीशिवाय वाहन सोडू नये

प्रत्‍येक वाहनाची या पथकाकडून तपासणी केली जाते. या पथकाला साहाय्‍य करण्‍यासाठी निवडणूक विभागातूनही एका पाेलिस शिपायाची नियुक्‍ती केली आहे. दारूची अवैध वाहतूक थांबविण्‍यासाठी कर्नाटकात जाणाऱ्या अन्‍य वाटाही बंद केल्‍या आहेत.

प्रत्‍येक वाहन तपासल्‍याशिवाय त्‍यांना सीमा ओलांडण्‍यास देऊ नये, अशी सक्‍त ताकीद देण्‍यात आल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक राऊत देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT