Provision in the budget for taxi drivers, the announcement of 115 electric buses Dainik Gomantak
गोवा

टॅक्सी चालकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद, 115 इलेक्ट्रिक बसेसची ही घोषणा

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज अर्थमंत्री या नात्याने सभागृहात सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. गोमंतकीय नागरिकांवर कोणताही कर न लादता मांडलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे (Sadanand Tanawade) यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात केली आहे. वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर देण्याच्या केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुमारे 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील कृषी संस्कृती वाढीस लागेल, असा विश्वास शेट - तानावडे यांनी व्यक्त केला.

राज्यातील सुमारे 350 शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच राज्यातील मासेमारी व्यवसायास प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी 10 बायोफ्लोक उभारण्याचीही घोषणा केली आहे. तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी तब्बल 65 कोटी रुपयांची तरतूद करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे, असेही शेट - तानावडे म्हणाले.

या अर्थसंकल्पातील (budget) सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील सार्वजनिक गाऱ्हाणी विभाग पुन्हा सुरू करणार ही आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला जाणार आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजनाही जाहीर केली आहे. याच बरोबर उत्तर गोव्यात ईएसआय इस्पितळ उभारले जाणार आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 115 इलेक्ट्रिक (Electric) बसेस घेणार असल्याची घोषणा केली आहे. याच बरोबर पणजी आणि मडगाव येथे पीपीपी तत्वावर अत्याधुनिक बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यामुळे नोकरदार, राज्यात येणारे पर्यटक आणि प्रवाशांची सोय होईल, असेही शेट - तानावडे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच जलस्रोत खात्यासाठी 540 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येईल. याच बरोबर येत्या ऑगस्टपर्यंत मोपा विमानतळ पूर्ण होईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यामुळे विद्यमान दाबोळी विमानतळावरील ताण कमी होईल. तसेच राज्यातील पर्यटन वाढीस लागून रोजगार निर्मिती होईल, अशी आशा शेट - तानावडे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी (CM) राज्यातील टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बसवण्यासाठी 20 कोटींची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील भाविकांसाठी मुख्यमंत्री देव दर्शन योजनेत 15 कोटींची भर घातली आहे. इतकेच नव्हे तर कोरोणाने निधन झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी 20 कोटींची तरतूद केली असल्याचे, ते म्हणाले.

राज्यातील उद्योगांसाठी लॉजिस्टि्स धोरणाची घोषणा केली असून राज्यातील बंद खाण व्यवसायही याच वर्षी सुरू करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून सर्वांना दिलासा देण्याचे काम केले असून याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे तमाम गोमंतकीय जनतेच्यावतीने मी आभार मानतो, असेही शेवटी सदानंद शेट - तानावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT