Margao Fish Market Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: सुविधा पुरवा अन्यथा सोपो देणार नाही

मडगाव घाऊक मासळी मार्केटमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली असून अस्वच्छ वातावरण पाहिल्यास कुणीही येथील मासळी खाणे पसंत करणार नाही.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगावमधील घाऊक मासळी मार्केटची (Margao Fish Market) स्थिती अत्यंत खराब बनली असून याचा थेट फटका विक्रेता तसेच ग्राहकांना बसत आहे. मार्केटमध्ये योग्य सुविधा उभारण्यासाठी वारंवार पीडीएकडे मागणी केली. पण पीडीएने याकडे दुर्लक्ष केले. आता पीडीए व कंत्राटदाराला मार्केटमध्ये सुविधा पुरवण्यासाठी एक डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा एक डिसेंबरनंतर सर्व व्यावसायिक सोपो देणे बंद करणार, असा इशारा घाऊक मासळी व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मुसा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला मिलाग्रीस आणि पीडीए जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मडगाव घाऊक मासळी मार्केटमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली असून अस्वच्छ वातावरण पाहिल्यास कुणीही येथील मासळी खाणे पसंत करणार नाही. मार्केटची स्थिती अनेक वेळा सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस तसेच पीडीए अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, त्यांनी सतत याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप मुसा यांनी केला.

परप्रांतीयांच्या व्यवसायाला सोपो कंत्राटाराकडून प्रोत्साहन

येथील व्यावसायिकांकडून वेळोवेळी सोपो शुल्क आकारण्यात येतो. मात्र, त्यांना योग्य सुविधा देण्यास पीडीए असफल ठरली आहे. सोपो कंत्राटदार मिलाग्रीस यांनी स्थानिक मच्छीमारांसह अनेक परप्रांतीय मासळी विक्रेत्यांनाही मार्केटमध्ये अवैधरित्या व्यवसाय करण्याची मुभा दिली असून त्यांच्याकडून पैसे उकळत आहे. पीडीए अध्यक्ष तसेच मिलाग्रीस यांनी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असून आता मार्केटमध्ये सुविधा उभारण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना वेळ देण्यात येत आहे, असेही मुसा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT