Chetan Kamat
Chetan Kamat Dainik Gomantak
गोवा

Pernem News : कोले यांना गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचा पाठिंबा

दैनिक गोमन्तक डिजिटल

सहा दिवसांपूर्वी पर्यटक टॅक्सी मालक असोसिएशनचे अध्यक्ष संजय कोले यांना मांद्रे आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून कथित मारहाण झाली. मात्र, याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक झालेली नाही, असा दावा करीत याच्या निषेधार्थ येत्या सोमवार, 29 रोजी कोले हे पेडणे पोलिस स्थानकासमोर धरणे आंदोलनास बसतील आणि या आंदोलनास आपला पाठिंबा असून मी तिथे कोले यांच्या समर्थनार्थ उभा असेन, असे अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी स्पष्ट केले.

संजय कोले हे स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या हितार्थ व हक्कांसाठी झगडणारे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोले यांनी गोवा माईल्स टॅक्सीसंदर्भात आमदार जीत आरोलकरांना प्रश्न विचारल्यानेच त्यांना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी कथित मारहाण केल्याचा आरोप चेतन कामत यांनी यावेळी केला. शुक्रवारी (ता.26) ते म्हापशात माध्यमांशी बोलत होते.

"अलीकडे कुणीही उठून स्थानिक टॅक्सीचालकांना लक्ष्य करत आहेत. टॅक्सीचालक नेते तसेच पुढाऱ्यांवर हेतुपुरस्सर हात उगारला जातोय. हे आम्ही खपवून घेणार नसून कोले यांना मारहाण केलेल्यांना अटक व्हावी, यासाठी सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात पेडणे ते काणकोणपर्यंत असलेल्या सर्व टॅक्सीचालकांनी पेडणे पोलिस स्थानकासमोर सहभागी व्हावे."

चेतन कामत, अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT