Protest for Road in Kundaim Dainik Gomantak
गोवा

'कुंडई औद्योगिक वसाहतीतील रस्ते सुधारा, अन्यथा...'

कामगारांची मागणी, डांबरीकरण सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

दैनिक गोमन्तक

मडकई : कुंडई औद्योगिक वसाहतीतील खराब रस्त्यांचा कामगारांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाल्याने फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याचे त्वरित डांबरीकरण न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी या कामगारांनी दिला. (Protest for Road in Kundaim News Updates)

कामगारांचा रेटा पाहून औद्योगिक महामंडळाचे उपव्यवस्थापक मुकुंद कायसूवकर यांनी आंदोलकांशी संवाद साधत लवकरच या रस्त्याचे गटार व्यवस्थेसह हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया जारी झाल्याचे सांगितले.

कुंडई (Kundaim) औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पार दैना झाली असून या खराब रस्त्यावरून वाहतूक करणे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना दुरापास्त झाले आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून खडी वर आल्याने रोजच या भागात अपघात (Accident) होत आहेत. या रस्त्यांची मागचा बराच काळ दुरुस्ती करण्यात आली नसल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असल्याचा आरोप या वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांनी केला. शेवटी आयडीसीतर्फे रस्ता डांबरीकरणासाठी त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर रस्त्यावरून कामगार हटले.

कुंडई औद्योगिक वसाहतीत कार्यरत बहुतांश कंपन्यांनी आयडीसीला देय असलेली रक्कम अजून फेडलेली नाही. ही रक्कम फेडण्यासाठी महामंडळातर्फे तगादा लावण्यात येत असला तरी या कंपन्यांकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे तीन कोटी रुपयांची ही रक्कम फेडलेली नसल्याने गोवा (Goa) औद्योगिक वसाहतीतील आवश्‍यक विकासकामांसाठी निधीचीही कमतरता असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT