Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसच्यावतीने फोंड्यात महागाईविरोधात निदर्शने

Goa Congress: भाजपकडून सर्वसामान्यांची निराशा केली असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला

दैनिक गोमन्तक

Goa Congress: राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली असून महागाईचा वाढता आगडोंब त्यातच बेरोजगारीचा चटका यामुळे युवावर्ग वैफल्यग्रस्त झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला.

काँग्रेस पक्ष सतर्क झाला असून फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर आज शनिवारी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी फ्रान्सिस सार्दिन बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच ॲड. वरद म्हार्दोळकर आणि राजेश वेरेकर व इतर काँग्रेस नेते उपस्थित होते.

सार्दिन म्हणाले की, राज्यात वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. केवळ राज्यातच नव्हे तर संबंध देशात महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे भाजप सरकारने पार मोडले असल्याने या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे सार्दिन म्हणाले.

अमित पाटकर तसेच राजेश वेरेकर व वरद म्हार्दोळकर आणि इतर काँग्रेस नेत्यांनीही भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले असून रोजगार नसल्याने युवावर्ग नोकरी आणि व्यवसायासाठी धडपडत असल्याचा आरोप केला.

सरकारकडून फक्त आश्‍वासने

खाणी सुरू करण्याची केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. खाणी तीन महिन्यात, सहा महिन्यात सुरू होतील, असे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र काहीच केले जात नाही. खाणीद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असल्याने खाणी कायदेशीर मार्गाने सुरू व्हायला हव्या होत्या, पण तसे न करता खाण अवलंबितांना आश्‍वासनांवर झुलवत ठेवले जात असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT