Rain  Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसामुळे गोव्यातील मालमत्तेचे नुकसान

फोंड्यात वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याची माहिती पुढे येत आहे.

दैनिक गोमन्तक

कोलवा: मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने सासष्टी किनारपट्टीवरील मालमत्तेचे नुकसान केले. पावसामुळे गुरुवारी कोलवा येथील एका बंगल्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने मोठे नुकसान झाले. (Property damaged in Goa due to rains)

अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 8 लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोलवा (Colva) येथील अन्य एका घटनेत नारळाचे झाड गाडीवर कोसळले.

सासष्टीतील बहुतांश गावांमध्ये अवकाळी मुसळधार पावसामुळे (Rain) वीज खंडित झाली होती. फोंड्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याची माहिती पुढे येत आहे. सायंकाळी उशिरा गोव्यातील (Goa) काही रस्त्यांवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वीज तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT